मुंबईत 24 डिसेंबरला संविधान सन्मान महामोर्चा होणारच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 December 2016

मुंबईत 24 डिसेंबरला संविधान सन्मान महामोर्चा होणारच

मुंबई / अजेयकुमार जाधव -
मुंबईमधील कथित लोकांचा संविधान गौरव महामोर्चा रद्द झाला असला तरी एट्रोसिटी कायद्याची कड़क अंमलबजावणी करावी, एट्रोसिटी कायद्याचा कश्या प्रकारे गैरवापर केला जात आहे या कायद्याची कड़क अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने कोणती कड़क पाउले उचलली याची श्वेतपत्रिका काढावी इत्यादी मागण्यासाठी तसेच एट्रोसिटी कायद्याची बदनामी करण्याचे षडयंत्र सुरु असल्याने त्या विरोधात मुंबईत 24 डिसेंबरला संविधान सन्मान महामोर्चा होणारच असल्याची माहिती श्यामदादा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्यामदादा गायकवाड यांच्यासोबत डॉ. भालचंद्र मुणगेकर, मनोहर जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना काही तरुणानी संविधान गौरव बहुजन महामोर्चा काढण्याचा प्रयत्न केला परंतू त्याना परवानगी व आझाद मैदानातील मुख्य जागा उपलब्ध झाली नसल्याने त्यांनी आपला मोर्चा रद्द करावा लागला आहे. या तरुणांच्या मोर्चाच्या नावाचे साधर्म्य असल्याने लोकांमध्ये अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. अनेकांनी फोन करून मोर्चा रद्द केला का अशी विचारणा केली याला सतत उत्तरे द्यावी लागत असल्याने ही पत्रकार परिषद आयोजित करून महामोर्चा होणारच हे सांगावे लागत असल्याचे गायकावाड यांनी सांगितले.

मुंबईमध्ये कोणी किती मोर्चे काढावे हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असून आमचा मोर्चा हा फुले शाहू आंबेडकर या विचारधारेला अनुसरून असणार आहे. दलित बहुजन समाजातील अनेकांनी आरएसएस आणि भाजपा विचारसरणी अवलंबली आहे. तर काहिनी नाशिक व सातारा येथे बौद्ध व दलितवस्तीवर हल्ले केले आहेत. अश्या लोकांची साथ देणारे लोक या मोर्चात सहभागी नसतील असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. आम्ही आणि आमच्या समाजाने या आधीही अनेक मोर्चे काढले असल्याने कोणत्याही मोर्चाची नक्कल न करता बोलका मोर्चा काढला जात असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

24 डिसेंबरला काढला जाणारा मोर्चा कोणत्याही समाजा विरोधात नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाबरोबर संवाद जुळवण्याचा प्रयत्न करणार केला जाणार आहे असे गायकवाड म्हणाले. मुंबईमध्ये मोर्चा असल्याने या मोर्चामध्ये युवकांनी भूमिका मांडणे अपुरी वाटते. यामुले मोर्चाच्याही पुढे जाउन समाजाला मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच मोर्चा दरम्यान मुख्यमंत्र्यांची भेट घेवून राजकारण, समाजकारण आणि नोटबंदी करून देश खड्ड्यात घातल्याने त्या विरोधात भाष्य केले जाणार असल्याचे डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी सांगितले.

मोर्चातील मागण्या
>>
एट्रोसिटी कायद्याची कड़क अंमलबजावणी करावी
>> नाशिकमधील बौद्ध दलितांवरील सामूहिक अत्याचाराची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन आयोग जाहिर करावा
>> बौद्ध दलित आदिवासी मुस्लिम अल्पसंख्यांकावरील अत्याचारांना कठोर पायबंद घालावा.
>> खैरलांजी ते कोपर्डी अत्याचारातील नराधम गुन्हेगारांना फाशी दया
>> मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण दया ओबीसींच्या आरक्षणात घुसकोरी करू होऊ देवू नका

Post Bottom Ad