मुंबई / प्रतिनिधी - 20 Dec 2016
बौद्ध एससी एसटी भटके विमुक्त ओबीसी व अल्पसंख्यांक समाजाच्या विविध मागण्यासाठी 24 डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानात दोन मोर्चे काढण्यात येणार आहेत. तसेच जानेवारी महिन्यात दोन मोर्चे काढले जाणार आहे. यामुले समाजामध्ये फुट पढू नए म्हणून संविधान गौरव महामोर्चा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा डॉ. आशिष तांबे यांनी पत्रकार परिषदेत केली.
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत एकाच विषयावर आणि मागण्यावर चार वेगवेगले मोर्चे काढ़णे योग्य नाही यामुले जो दबाव गट निर्माण व्हायला हवा असा दबाव गट निर्माण होउ शकत नसल्याने 24 डिसेंबरचा मोर्चा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सर्वानी एकत्र येवून एकच सर्वसमावेशक मोर्चा काढावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
संविधान गौरव बहुजन महामोर्चाच्या वतीने नुकतीच मुंबईत बाईक ऱ्याली काढण्यात आली. या ऱ्यालीला युवाकांचा उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळाला होता. या ऱ्याली मुले मुंबईत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते या मुले मोर्चाची तयारी जोरात सुरु होती परंतू चार मोर्चा मधून समाज विखुरला जाऊ नए म्हणून मोर्चा रद्द करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. मोर्चा ऐवजी आता मुंबईत एट्रोसिटी व आरक्षण या विषयावर युवा परिषद आयोजित करण्यात येणार असल्याचे डॉ. तांबे यांनी सांगितले.
24 डिसेंबरचा मोर्चा रद्द केला असला तरी समाजामध्ये चांगला दबाव गट निर्माण करण्यासाठी समिती काम करत राहणार आहे. यासाठी युवकांची फळी उभी केली जाणार आहे. तसेच मुंबईत एकच मोर्चा निघावा म्हणून प्रयत्न सुरु आहेत. मुंबईमध्ये एकच मोर्चा निघणार असल्यास त्या मोर्चात समिती सहभागी होईल असेही यावेळी सांगण्यात आले.