दृष्टिहीनांच्या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 December 2016

दृष्टिहीनांच्या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड

मुंबई - जानेवारी 2017 पासून प्रारंभ होत असलेल्या दृष्टिहीनांच्या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी आंध्रप्रदेशच्या अजय कुमार रेड्डीची निवड करण्यात आली असून कर्नाटकचा प्रकाश जयारामैया याची उपकर्णधार म्हणून वर्णी लागली आहे. 17 जणांच्या चमूमध्ये अनिश बेग हा महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू आहे.

दहा राज्यातून एकूण 27 जणांचा चमू निवडण्यात आला असून नऊ खेळाडू हे राखीव ठेवण्यात आले आहेत, असेक्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाईंड ईन इंडियाचे (कॅबी)अध्यक्ष महंतेश के. यांनी सांगितले. स्पर्धेचा अंतिम सामना 12 फेब्रुवारीला बंगळूरु येथे खेळविण्यात येणार आहे.

भारताच्या कर्णधारपदी एकूण संघामध्ये चार खेळाडू आंध्रप्रदेशचे, दोन खेळाडू हरयाणा, ओडिशा, गुजरात, कर्नाटक यांचे आहेत तर, केरळ, महाराष्ट्र, झारखंड, मध्यप्रदेश व उत्तरप्रदेशचा एक-एक खेळाडू आहे. भारतीय संघाचे शिबिर 5 जानेवारीपासून इंदूर येथे प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला 20 लाख व उपविजेत्या संघाला 15 लाख रुपयांचे बक्षीस असेल.

भारतीय संघ : 
अजय कुमार रेड्डी (कर्णधार), प्रकाश जयारमैया (उप-कर्णधार), दीपक मलिक, रामबीर सिंग, सुखराम माझी, टी दुर्गा राव, सुनील आर., डी. वेंकटेश्‍वरा राव, गणेशभाई मुहुंडकर, मोहम्मद फैझल, मोहम्मद फरहान, केतनभाई पटेल, मोहम्मद जाफर इकबाल, सोनू गोलकर, गोलु कुणार, अनिश बेग, प्रेम कुमार जी.

Post Bottom Ad