क्रीडा संचालनालयातर्फे 17 वर्षांखालील मुलांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 December 2016

क्रीडा संचालनालयातर्फे 17 वर्षांखालील मुलांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

मुंबई, दि 23 : शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यामार्फत दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर करण्यात येते. भारतीय शालेय खेळ महासंघ आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यामार्फत सन 2016-17 या वर्षात 17 वर्षाखालील मुलांसाठी राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत देशातील अंदाजे 30 राज्यांतून सुमारे 550 खेळाडू सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धा येत्या 25 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत आझाद मैदान, क्रॉस मैदान, ओव्हल मैदान, मुंबई पोलीस जिमखाना, ईस्लाम जिमखाना, पी. जी. हिंदू जिमखाना,पारसी जिमखाना, सचिवालय जिमखाना येथे होणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांमधून चांगले खेळाडू घडावेत हा राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा आयोजित करण्याचा हेतू आहे. या स्पर्धांना मुंबईतील क्रिकेट रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा मुंबई विभागाचे उपसंचालक यांनी केले आहे.

Post Bottom Ad