मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 1 ते 15 जानेवारी, 2017 पर्यंत साजरा होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 December 2016

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 1 ते 15 जानेवारी, 2017 पर्यंत साजरा होणार

मुंबई, दि.17 : मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व संवर्धनासाठी तसेच अमराठी भाषिकांना मराठी भाषेचा परिचय व्हावा यासाठी 1 ते 15 जानेवारी 2017 या कालावधीत `मराठी भाषा संवर्धन पंधरवडा` मराठी भाषा विभागामार्फत साजरा करण्यात येणार आहे. 

 या कालावधीमध्ये राज्यातील सर्व शासकीय, निम-शासकीय कार्यालय, महामंडळे तसेच राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारितील सर्व कार्यालये, मंडळे सार्वजनिक उपक्रम सर्व खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये आदी सर्व संस्थांमध्ये `मराठी भाषा संवर्धन पंधरवडा` साजरा करण्यात येणार आहे.

या पंधरवड्यात विविध परिसंवाद, व्याख्याने, विविध स्पर्धा,कार्यशाळा, शिबीरे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, काव्य वाचन आणि कथाकथन स्पर्धा, अमराठी भाषिकांसाठी मराठी भाषेचा सुलभ पद्धतीने परिचय करुन देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन आदी कार्यक्रम होणार आहेत. सदर परिपत्रक www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेताक 201612031651188433 असा आहे.

Post Bottom Ad