बेस्टसाठी स्वतंत्र मार्गिका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 November 2016

बेस्टसाठी स्वतंत्र मार्गिका

मुंबई : बेस्टच्या स्वतंत्र मार्गिकेसाठी (बीआरटीएस) वरळी आणि महालक्ष्मी येथील रस्त्यांचा काही भाग राखीव ठेवण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या आहेत. या प्रयोगामुळे पुढच्या पाच महिन्यांत बेस्ट सेवा जलद होऊन मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार आहे.

वाहतुकीच्या कोंडीत बेस्ट बस रखडत असल्याने त्याचा अप्रत्यक्ष परिणाम उत्पन्नावर होत आहे. यामुळे बसगाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवण्याची बेस्टची अनेक वर्षांची मागणी आहे. पहिली बीआरटीएस सेवा वांद्रे-कुर्ला संकुलात सुरू करण्यात आली. हा प्रयोग यशस्वी ठरल्यामुळे आता नवीन मार्ग निवडण्यात आला आहे.

वाहतूक पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाल्यामुळे डॉ. ई. मोझेस मार्ग, डॉ. ए.बी. आंबेडकर मार्ग, लाला लाजपत राय मार्ग (हाजी अली) आणि केशवराव खाड्ये मार्ग (वरळी, महालक्ष्मी ) हे चार मार्ग स्वतंत्र मार्गिकेसाठी खुले करण्यात येणार आहेत. यासाठी ३२ कोटी ६८ लाख रुपये खर्चाचा अंदाज महापालिकेने आखला आहे. त्यानुसार चार महिन्यांत या प्रकल्पावर काम होणे अपेक्षित आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रे, दहिसर, सायन ते मुलुंडवर बीआरटीएस शक्य होणार आहे. या चार बस मार्गांवर स्वतंत्र मार्गिका ठेवण्यास बेस्ट आणि वाहतूक विभागाने महापालिकेला विनंती केली. बस थांब्याजवळच्या रस्त्याची जागा बीआरटीएससाठी राखून ठेवण्यात येणार आहे. महापालिकेच्या अहवालानुसार, रस्त्याचा ७४.४ किमी भाग स्वतंत्र मार्गिकेसाठी राखून ठेवणे शक्य होईल.

Post Bottom Ad