मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी - २०१७ मध्ये नियत आहे. या निवडणूकी दरम्यान मुंबई महापालिका क्षेत्रात साडे आठ हजार मतदान केंद्रे कार्यान्वित करण्यात येतात. या प्रत्येक मतदान केंद्रांवर किमान ५ इतक्या संख्येने कर्मचा-यांची आवश्यकता असते. याव्यतिरिक्त आकस्मिक गरज लक्षात घेऊन किमान १० टक्के राखीव कर्मचारी देखील निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असतात. यानुसार निवडणूकीसाठी साधारणपणे ५० हजार एवढ्या संख्येतील कर्मचा-यांची आवश्यकता असते. यापैकी बहुतांश कर्मचारी हे महापालिकेच्या अखत्यारितील असतात. ही बाब लक्षात घेता महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर व नागरी सेवा सुविधांवर या बाबीचा परिणाम होऊ नये, यादृष्टीने व्यवस्थापकीय उपाययोजना म्हणून महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचा-यांना जानेवारी - २०१७ ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अर्जित वा तत्सम रजा मंजूर करु नये, असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने साधारणपणे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नामनिर्देशन सुरु होईल. यासाठी महापालिकेतील विविध पदांवर कार्यरत व्यक्तींच्या सेवा अधिग्रहीत कराव्या लागणार आहेत. याव्यतिरिक्त निवडणूक विषयक तयारीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठीही महापालिकेचे कर्मचारी अधिग्रहीत करणे क्रमप्राप्त असणार आहे. या बाबी लक्षात घेऊन महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर तसेच नागरी सेवा सुविधांवर परिणाम होऊ नये, याउद्देशाने महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचा-यांना जानेवारी - २०१७ पासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोण-त्याही प्रकारची अर्जित रजा वा तत्सम रजा मंजूर करु नये, असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नुकत्याच निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकान्वये दिले आहेत.