मुंबई : मोठ्या लोकांनी चुका केल्या तर त्यांना फासावर चढवा. पण सामान्य, गरीब आणि निराधार माणसांच्या पैशाला काळा पैसा ठरवून त्यांना त्रास देऊ नका. सरकारने सामान्य लोकांची दुखणी वाढविली असताना पंतप्रधान मात्र काळ्या पैशावाल्यांची झोप उडाल्याचे सांगत आहेत. संपूर्ण देशच गुन्हेगार असल्याचे भासविण्यात येत असून नोटाबंदीचा निर्णय म्हणजे एकप्रकारची आर्थिक आणीबाणी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर केली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाटकोपर येथे राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्यावतीने ‘परिवर्तन रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संबोधित करताना शरद पवार बोलत होते.
शरद पवारांनी यापूर्वी नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. यामुळे पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दिवंगत इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी आणली होती. तेव्हाही देशाचे कल्याण होणार, गुन्हेगारी, गरिबी दूर होणार असे सांगण्यात आले होते. तसेच चलनबंदीबाबत सांगण्यात येत आहे. सुरुवातीला बरे वाटले आता मात्र त्यातील भानगड लक्षात येत आहे. नववनीन घोषणेने सामान्य माणसाला गोंधळली आहे. ही आर्थिक आणीबाणी आहे. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत इंदिरा गांधीचा साफ धुव्वा उडाला होता. तशीच वेळ मोदींवर येणार असल्याचे पवार यावेळी म्हणाले.
मुंबई लोकलवर आठ हजार कोटी खर्च केले तर मुंबईकरांचे प्रश्न सुटतील, परंतु ९८ हजार कोटी खर्च करून त्यांना बुलेट ट्रेनने अहमदाबादला जायची घाई लागली आहे, अशी टीका पवार यांनी केली. त्यामुळे मुंबई महापालिकेत परिवर्तन आवश्यक असल्याचे पवारांनी सांगितले. ८६ टक्के नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. हा देश कष्टकऱ्यांचा, मजुरांचा, कामगारांचा आहे, हे आपल्याला पुन्हा सिद्ध करावे लागेल. त्यामुळे आता सत्ताधारी मत मागायला जातील, तेव्हा काळ्या पैशांच्या विषयावर जनता त्यांना धडा शिकवेल, असेही पवार म्हणाले. तत्पूर्वी माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल, आ. जयंत पाटील आणि पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आदी नेत्यांची भाषणे झाली.