ज्ञानेश महाराव, सुधारक ओल्वे रमेश शिंदे यांना "मी बुध्दिस्ट पुरस्कार" जाहिर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 November 2016

ज्ञानेश महाराव, सुधारक ओल्वे रमेश शिंदे यांना "मी बुध्दिस्ट पुरस्कार" जाहिर

मुंबई / प्रतिनिधी –
मी बुध्दिस्ट फाऊंडेशन या संस्थेच्यावतीने सामाजिक- सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणा-या व्यक्तींना "मी बुध्दिस्ट पुरस्काराने" सन्मानित करण्यात येते. जेष्ठ पत्रकार व चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव आणि आंबेडकर साहित्याचे संग्राहक आणि अभ्यासक रमेश शिंदे यांना हा पुरस्कार जाहिर झाला आहे. शनिवार २६ नेाव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता, छबीलदास शाळा हॉल दुसरा मजला आयडियल बुक डेपो समोर दादर (पश्चिम) येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. ज्येष्ठ अभ्यासक आणि पंतप्रधानांचे माजी सल्लागार सुधींद्र कुळकर्णी यांच्या हस्ते आणि लोकसत्ताचे उपसंपादक मधु कांबळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी आंतरराष्ट्रीचे ख्यातीचे छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओल्वे यांचाही विशेष पुरस्कार देऊन सत्कार केला जाणार आहे. तसेच अरूण विश्वंभर यांच्या 'मराठी क्रांती मोर्चा आणि सत्यनारायण व्हर्सेस संविधान' या दोन विषयांवरच्या पुस्तकाचे प्रकाशनही होणार आहे अशी माहिती अॅड. विश्वास काश्यप यांनी दिली. ज्ञानेश महाराव हे ३२ वर्ष मराठी पत्रकारितेत कार्यरत आहेत. परखड वक्ते व्याख्याते अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी विविध विषयावर सडेतोड लेखन केले असून अनेक पुस्तकांच लेखन त्यांनी केलं आहे. रमेश शिंदे हे बीपीटी डॉक्समध्ये ३५ वर्षे नोकरी करून सेवानिवृत्त झाले आहेत. आंबेडकरी चळवळीच्या सर्व सत्याग्रहात त्यांचा सहभाग आहे. सातत्याने लिखान, भाषणे व धम्मावर प्रवचने देऊन समाजामध्ये प्रबोधनाचे कार्य सुरू आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, दलित चळवळ, कर्मवीर दादासाहेब इत्यादींचे दुर्मिळ ग्रंथाचे संग्राहक असून अंदाजे ५ हजार ग्रंथांचा खजिना त्यांच्याकडे आहे.

Post Bottom Ad