मुंबई - मंगळवारी ( 22 नोव्हेंबर 2016 ) जाहीर झालेल्या विधान परिषदेच्या निकालानंतर कॉग्रेसचे संख्याबळ एक ने वाढले आहे. यामुळे विधान परिषदेमध्ये सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून विरोधी पक्ष नेतेपद कॉग्रेला मिळावे अशी मागणी हिवाळी अधिवेशनापुर्वी कॉग्रेसकडून करण्यात येणार आहे. तशी मागणी कॉग्रेसच्या मुबंईत नेत्यांच्या बैठकीत झाल्याची माहीती सुत्रांकडून समजते.
मिळालेल्या माहिती नुसार हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वी अशी लेखी मागणी सभापतींकडे केली जाणार आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी कॉग्रेसकडून अनूभवी व आक्रमक अभ्यासु व्यक्तीमत्व असलेले माजी मुख्यमंत्री व कोकणचा बुलंद आवाज म्हणून प्रसिद्ध असलेले नारायण राणे यांचे नाव आघाडीवर असून त्यांच्या नावाची शिफारस केंद्रीय कमिटीकडे करणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. राणे यांनी सेनेत असताना विधान सभेचे विरोधी पक्षनेते पद यशस्वीपणे सांभाळले होते. त्यावेळी राणे यांनी सरकारला आपल्या अभ्यासु व आक्रमक स्वभावाने सरकारला जेरीस आणले होते. कॉग्रेसला महाराष्ट्रात पुन्हा गतवैभव मिळवुन देणेसाठी व आगामी जि.प व पं.स.निवडणुकीत स्वबळावर यश संपादन करावयाचे असल्याने सर्व मतभेद बाजुला ठेवत नारायण राणे यांच्यासारखे आक्रमक नेतृत्व पक्षाने स्विकारून विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी राणें यांच्याकडेच सोपवावी यावर एकमत झाल्याचे सुत्राकडून समजते.