डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्तच्या सोयीसुविधांचा मुख्यमंत्री महोदयांकडून आढावा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 November 2016

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्तच्या सोयीसुविधांचा मुख्यमंत्री महोदयांकडून आढावा

मुंबई, दि. 29 Nov : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे देण्यात येणाऱ्या सुविधांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेऊन यंदा मोठ्या प्रमाणावर अनुयायी जमणार आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी विविध विभागाने समन्वय ठेवून सोयीसुविधा द्याव्यात, असे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.
मंत्रालयातील समिती कक्षात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, गृहराज्य मंत्री दिपक केसरकर, मुंबई महानगर विकास प्राधिकरणचे आयुक्त प्रविण दराडे, नगरविकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुरेंद्रकुमार बागडे, राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, उपायुक्त पल्लवी दराडे, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, सहआयुक्त देवेन भारती यांच्यासह रेल्वे, महावितरण, आरोग्य आदी विविध विभागाचे अधिकारी यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्यव समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, महेंद्र साळवे, भदन्त करुणानंद थेरो यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. दराडे यांनी महानगरपालिकेच्या वतीने चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे उभारण्यात देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती दिली. तर भारती यांनी पोलीसांच्या बंदोबस्ताविषयी माहिती दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशभरातून लाखो अनुयायी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे येत असतात. या वर्षी 60 वा महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे नेहमीपेक्षा जास्त अनुयायी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुविधा देणाऱ्या यंत्रणांनी समन्वय ठेवून त्यादृष्टिने तयारी करावी. महापरिनिर्वाण दिनाच्या नियोजनात समन्वय समितीची भूमिका महत्त्वाची असून विविध विभागांनी त्यांच्या सल्ल्याने नियोजन करावे. तसेच समन्वय समितीने यंदा अवयवदान अभियान राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले.

समन्यव समितीच्या वतीने सरचिटणीस कांबळे व साळवे यांनी तयारीसंदर्भातील सूचना केल्या. समितीच्या वतीने यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र भेट देण्यात आले. यावेळी समितीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त काढण्यात आलेल्या ‘6 डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कसा पाळावा?’ या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

Post Bottom Ad