निर्णय फसला तर देश खडय़ात जाणार - राज ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 November 2016

निर्णय फसला तर देश खडय़ात जाणार - राज ठाकरे

मुंबई 19 Nov 2016 : केंद्र सरकारने जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर याचा सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसत आहे, या निर्णयामुळे सामान्य जनतेला सरकारने रस्त्यावर आणले, त्यामुळे हा निर्णय फसला तर देश खडय़ात जाणार असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर केली.

मुंबईतील प्रभादेवी येथे मनसे पदाधिकाऱयांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, संपूर्ण देश रोख व्यवहारावर चालतो, त्यामुळे हा निर्णय घेताना कोणत्याही प्रकारचे नियोजन केले गेले नाही, नोटाबंदीच्या निर्णयावर कोणीच बोलत नाही, सामान्यांना रस्त्यावर का आणले. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी धाडी का टाकल्या जात नाहीत, केंद्र सरकारकडून चांगले होणार असे सांगितले जात आहे, पण नक्की काय चांगले होणार हे देखील पाहावे लागेल. या निर्णयानंतर काय चालले आहे हे कोणालाच समजत नाही, दररोज वेगवेगळा निर्णय घेतला जात आहे. त्यामुळे देश अराजकतेकडे जात असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत ते म्हणाले, गोव्यात मोदींना जाहीर सभेत हुंदका येतो आणि बारामतीत पवारांचा हात धरुन राजकारणात आलो असे म्हणतात. तसेच मोदी सरकारकडे तीन वर्षे होती या तीन वर्षात काय केले, आता त्यांना आणखीन 50 दिवस कशासाठी असा घणाघातही राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर केला.

Post Bottom Ad