मुंबई 25/11/2016 : व्यसनांना आळा घालणे, तसेच व्यसनी व्यक्तींचे मतपरिवर्तन करून, त्यांना निर्व्यसनी बनविणे हे नशाबंदी मंडळाचे उद्दिष्ट साध्य व्हावे आणि समाजापुढे व्यसनमुक्तीचा संदेश जावा, याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्यसनमुक्ती पथनाट्य स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेचे यंदा ८ वे वर्ष असून, नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य आणि एम.डी. महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना यांच्या सहयोगाने ही स्पर्धा पार पडणार आहे. व्यसनमुक्ती हा स्पर्धेचा विषय आहे, या स्पर्धेत प्रथम क्रमांकाकरिता १,१११ रुपये, द्वितीय स्थानासाठी ९९९ रुपये आणि तृतीय स्थानाकरिता ७७७ रुपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक, सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ही स्पर्धा २८ नोव्हेंबर रोजी ओल्ड कस्टम हाउस, तळमजला सभागृहाबाहेर, शहीद भगतसिंग मार्ग येथे दुपारी २ ते सायंकाळी ६ पर्यंत पार पडेल. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा ६ डिसेंबर, रोजी शिवाजी पार्क, चैत्यभूमी दादर येथे होईल. अधिक माहितीसाठी 08652067888 किंवा 022 - 22664456 या क्रमांकावर संपर्क साधावा.