मुंबई - भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाने 2016-17 वर्षाकरिता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 100 शिष्यवृत्त्यांसाठी अर्ज मागविले आहेत.
अभियांत्रिकी व व्यवस्थापन, प्युअर व अप्लाईड सायन्स, कृषी विज्ञान व वैद्यकीय, आंतरराष्ट्रीय व्यापार, खातेकरण, वित्तीय व मानवी, सामाजिक विज्ञान व ललित कला या शाखांतील विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येईल. ही शिष्यवृत्ती संबंधित देशातील प्राधिकरणांद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था यांच्याकडे मास्टर्स व पीएच.डी. साठी उच्च शिक्षण घेणाऱ्यांकरिता आहे. उमेदवारांची एम्प्लॉयमेंट न्यूजमधील जाहिरातीच्या महिन्याच्या पहिल्या दिवसाची वयोमर्यादा 35 वर्षांच्या आतील असावी व मास्टर/बॅचलर्स अभ्यासक्रमासाठी गुणांची किमान आवश्यकता 55 टक्के आहे. तसेच उत्पन्नाची कमाल मर्यादा रु. 6 लाख दरसाल अशी आहे.
उमेदवारांना विहित अर्जामधील त्यांच्या पात्रता व अनुकूलतेच्या मूल्यांकनापश्चात योजनेच्या अटींनुसार ही सेवा लागू होते. वित्तीय वर्ष 2016-17 च्या दि. 31 मार्चपर्यंत स्वीकृत झालेले अर्ज शिष्यवृत्तीवरील निर्णय/पुरस्काराच्या अनुदानाकरिता गृहित धरले जातील. अर्ज, योजनेचा तपशील व प्रारुप यांकरिता कृपया www.socialjustice.nic.in या संकेतस्थळास भेट द्यावी.