महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची कर्ज प्रक्रिया पारदर्शक करणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 November 2016

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची कर्ज प्रक्रिया पारदर्शक करणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

मुंबई, दि. 29 Nov 2016 : महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळांतर्गत कर्ज वसुली प्रक्रिया ऑनलाइन राबवून पारदर्शक, सुलभ, गतिमान करण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज दिले. 
मंत्रालयात महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक मंडळाची आढावा बैठकीचे आज झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आर.ए.बेद, राष्ट्रीय अनुसुचित जाती जमाती महाव्यवस्थापक देवानंद, उपमहाव्यवस्थापक व्हि.पी.सिंग तसेच संबधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री बडोले म्हणाले की, कर्ज वसुलीसंदर्भात जिल्हानिहाय मेळाव्याचे आयोजन करुन त्यांना मार्गदर्शन करणे, जाहिरातीच्या माध्यमातून प्रबोधन करणे,याविषयासंदर्भात नियोजन करुन आराखडा तयार करावे. राज्यस्तरावर व प्रादेशिक स्तरावर महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या वतीने अंतर्गत प्रोत्साहनपर म्हणून उद्योग भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचेही बडोले यांनी सांगितले

सामाजिक न्याय राज्यमंत्री कांबळे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतामध्ये मुद्रा योजना सुरु केली. महामंडळानेही अशा प्रकारची योजना राबवावी तसेच कर्जप्रणालीतील मध्यस्थी बंद करण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad