२८ नोव्हेंबरला मुंबई काँग्रेस तर्फे जन आक्रोश मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 November 2016

२८ नोव्हेंबरला मुंबई काँग्रेस तर्फे जन आक्रोश मोर्चा

मुंबई 24 / 11 2016 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटबंदीच्या विरोधात आवाज उठवला आहे. सर्व विपक्षी दलांच्या प्रतिनिधींसोबत काँग्रेसची एक बैठक झाली आणि त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की येणारा २८ नोव्हेंबर हा दिवस आक्रोश दिवस म्हणून देशभर साजरा केला जाईल. यादिवशी संपूर्ण देशभर मोदी सरकारच्या या नोटबंदीच्या निर्णयाविरोधात आक्रोश केला जाईल, आंदोलन केले जाईल. त्याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या २८ नोव्हेंबर ला मुंबईमध्ये मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली जन-आक्रोश मोर्चा काढण्यात येईल.

याबद्दल माहिती देताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले की, पूर्ण देशामध्ये या नोटबंदीच्या निर्णयामुळे हाहाकार माजला आहे. लोकांचा जीव जातो आहे. अर्थव्यवस्था ठप्प पडली आहे. लोकांच्या मनामध्ये आक्रोश आहे, संताप आहे. त्यांच्या या भावना सरकारपर्यंत पोहचाव्यात यासाठी, सरकारला जागे करण्यासाठी मुंबई काँग्रेस तर्फे २८ नोव्हेंबरला जन-आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. सुमारे ५०००० ते १००००० लोकांचा जनसमुदाय यादिवशी काँग्रेस सोबत रस्त्यावर उतरेल.

माझे सर्व मुंबईकरांना, सर्व व्यावसायिकांना, सर्व सामाजिक संस्था तसेच सर्व क्षेत्रातील लोकांना असे आवाहन आहे की, त्यांनी या मोर्चामध्ये सामील व्हावे आणि आपले दुखः, आपल्या यातना, आपला आक्रोश सरकारपुढे मांडावा. माझे इतर विरोधी पक्षातील नेत्यांना सुद्धा आवाहन आहे की त्यांनी सुद्धा या मोर्चामध्ये सामील व्हावे व जनतेचे दुखः सरकारपुढे मांडावे, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.

हा मोर्चा सांताक्रूझ पूर्व येथील डॉ आंबेडकर चौक, सीएसटी रोड, कालिना येथून सुरु होईल आणि हंसभुग्रा रोड - हायवे - बांद्रा खेरवाडी जंक्शन येथे या मोर्चाचे जाहिर सभेत रुपांतर होईल. सदर जन-आक्रोश मोर्चा संदर्भात आज मुंबई काँग्रेस कार्यालयात मुंबईतील काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासोबत माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार नसीम खान, माजी आमदार चंद्रकांत हंडोरे, युसुफ अब्राहनी, अशोक जाधव, चरणसिंह सप्रा, मधु चव्हाण, मुंबई काँग्रेस सरचिटणीस संदेश कोंडविलकर, भूषण पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ राजू वाघमारे, सर्वस्वी मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी आणि ब्लॉक अध्यक्ष उपस्थित होते.

Post Bottom Ad