केईएम रुग्णालय परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 'विसावा' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 November 2016

केईएम रुग्णालय परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 'विसावा'

मुंबई /प्रतिनिधी - 21/11/2016 - पालिकेच्या 'केईएम' रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी देशाच्या विविध भागातून येणा-या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मुंबई महापालिकेने विश्रांती स्थळ उपलब्ध केले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना काही वेळ विश्रांती मिळावी हा उद्देश असून या स्थळाला विसावा असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये शौचालय व स्नानगृहाची सुविधा आहे. विसावाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले असल्य़ाची माहिती सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली.

केईएम रुग्णालय परिसरातील प्रवेशद्वार क्रमांक ७ जवळ विसावा उभारण्यात आले आहे. परळ, लालबाग, शिवडी, कॉटन ग्रीन, काळाचौकी, भोईवाडा आदी परिसरांसह केईएम रुग्णालय परिसराचा समावेश होतो. विसावा' मधील दैनंदिन व्यवस्था व देखभाल यासाठी 'तन्वी नागरी सेवा संस्था' या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे 'विसावा' मधील सेवा सुविधांसाठी महापालिकेच्या नियम व पद्धतीनुसार नाममात्र दर आकारले जाणार असून याबाबतची दर निश्चिती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असल्याचे मोटे यांनी सांगितले.

Post Bottom Ad