मुंबई काँग्रेसतर्फे “नोट पे चर्चा” अभियान सुरु - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 November 2016

मुंबई काँग्रेसतर्फे “नोट पे चर्चा” अभियान सुरु

मुंबई 21/11/2016 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रुपयाच्या नोटा चलनातून नाहीसे केल्यामुळे सर्व सामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. जनतेला स्वतःचेच कमावलेले पैसे बँकेतून बदलून घेण्यासाठी बँकेच्या बाहेर तासंतास रांगेत उभे राहावे लागत आहे. याचा लोकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. आत्तापर्यंत रांगेत ५६ जणांचा मृत्यू देखील झालेला आहे. यासाठीच मुंबई काँग्रेसतर्फे मंगळवार, २२ नोव्हेंबर २०१६ पासून नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या निर्णयाची माहिती देण्यासाठी, ५०० व १००० रुपयाच्या नोटाबंदिसंदर्भात “नोट पे चर्चा” अभियान बँक ऑफ इंडिया व सिंडिकेट बँक जे. जे. हॉस्पिटलजवळ, भायखळ्यापासून सुरु करीत आहे. हे अभियान मार्केट, स्टेशन, मैदानात, बँकेबाहेर किंवा बँकेजवळ होणार असून यामध्ये जनतेत जाऊन जनतेशी संवाद साधणार असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले की नोटाबंदिमुळे कोणाच्याच घरात लग्न होत नाही आहेत, रुग्णांना उपचार मिळत नाही आहेत. डायमंड मार्केट, ज्वेलरी मार्केट, रिटेल मार्केट, हॉटेल इंडस्ट्री, हेल्थकेअर इंडस्ट्री, होम अप्लायांस, फार्मा इंडस्ट्री, लेदर इंडस्ट्री, कपडा मार्केट सर्व इंडस्ट्री ७० ते ८० टक्के डाऊन झालेली आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. नरेंद्र मोदी म्हणतात काळा पैसा व भ्रष्टाचार रोखण्यासाठी हे त्यांनी पावूल उचललेले आहे. माझा त्यांना असा सवाल आहे की, ५०० व १००० रुपयांची नोट बंद करून मग त्यांनी एकदम २००० रुपयांची नोट का काढली. त्यामुळे काळा पैसा व भ्रष्टाचार करणार्यांचे फावणार आहे. आमच्या माहितीनुसार मोदीजी नोटाबंदीची घोषणा करण्याआधीच त्यांच्या मर्जीतील नेते व उद्योगपती यांना मोदिजींनी आधीच याची कल्पना दिली होती. तेव्हा त्यांनी आपला पैसा फिरवून घेतला, त्यांना काहीच अडचण झाली नाही परंतु त्रास मात्र सामान्य जनतेला व गरीब लीकांना होत आहे. अशी परिस्थिती अजून ६ ते ७ महिने चालणार आहे.

संजय निरुपम पुढे म्हणाले की, विजय माल्या सारख्या कर्ज बुडवे ६३ उद्योगपतीचे कर्ज भाजापा सरकारने माफ केले आहे हा एक खूप मोठा भाजपाचा व नरेंद्र मोदींचा घोटाळा आहे. ६३ उद्योगपतीचे कर्ज सुमारे ७००० करोड रुपये भाजापा सरकारने माफ केले आहे. यामागे काय कारण आहे हे मोदिनी जनतेला सांगावे. नरेंद्र मोदिनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी २५,००० करोड रुपये वापरले, एवढे पैसे कुठून आले. ते पैसे सफेद की काळे, हे हि जनतेसमोर त्यांनी स्पष्ट करावे. नरेंद्र मोदींचा हा चुकीचा निर्णय त्यांनी जाहिर केला परंतु तो राबवण्यासाठी सरकारकडे कोणतीच सक्षम व्यवस्था नाही आहे. जनतेचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहे.  मुंबई काँग्रेसतर्फे रांगेत उभे राहणाऱ्या जनतेसाठी ठीकठीकाणी पिण्याच्या पाण्याची तसेच बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे निरुपम यांनी सांगितले.

जनजागरण अभियान - 
मंगळवार, दि. २२ नोव्हेंबर, २०१६ रोजी सकाळी १०.०० वाजताबँक ऑफ इंडिया व सिंडिकेट बँक, जे.जे.रुग्णालया जवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, भायखळा, मुंबई

बुधवार, दि. २३ नोव्हेंबर, २०१६ रोजी सकाळी १०.०० वाजता कुर्ला, मुंबई

गुरुवार, दि. २४ नोव्हेंबर, २०१६ रोजी सकाळी १०.०० वाजता अंधेरी (पश्चिम), मुंबई

शुक्रवार, दि. २५ नोव्हेंबर, २०१६ रोजी सकाळी १०.०० वाजता मालाड (पश्चिम), मुंबई

शनिवार, दि. २६ नोव्हेंबर, २०१६ रोजी सकाळी १०.०० वाजता घाटकोपर, मुंबई

सोमवार, दि. २८ नोव्हेंबर, २०१६ रोजी सकाळी १०.०० वाजता ९० फिट रोड, धारावी, माहिम (पूर्व), मुंबई

Post Bottom Ad