नोटबंदी विरोधात काँग्रेसचे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 November 2016

नोटबंदी विरोधात काँग्रेसचे आंदोलन

मुंबई 22 Nov 2016 – मुंबई काँग्रेसने नोटबंदी विरोधात मंगळवारी मुंबईच्या जे जे रुग्णालयाच्या परिसरात आंदोलन केले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुंबईत दररोज वेगवेगळया ठिकाणी हे आंदोलन करणार असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी सांगितले.

नोट बंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. १४ दिवस होऊनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही त्यामुळे नागिरकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात आवाज उठवण्यासाठी मुंबई काँग्रेसच्यावतीने मंगळवारीपासून नोट पे चर्चा या अंतर्गत आंदोलन सुरू केले आहे. काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकत्यांनी हे आंदोलन केले. नोट बदलून घेण्यासाठी नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. रांगेत उभे राहावे लागत असल्याने आतापर्यंत ७० लोकांना जीव गमवावा लागला आहे. या मृत्यूला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जबाबदार असल्याचा आरोप करीत निरूपम यांनी मोदी यांच्यावर ३०२ कलमानुसार मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला पाहिजे अशी मागणी काँग्रेसने केली. देशात सध्या सामान्य जनतेची पिळवणूक सुरु आहे,आपला हक्काचा पैसे देखील लोकांना मिळत नाही. त्यामुळे मुंबई काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असून हे आंदोलन मुंबईभर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले

Post Bottom Ad