वीज देयके भरण्यासाठी = मोबाईल ऍप, क्‍लाऊड सेवा बेस प्रणालीचा वापर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 November 2016

वीज देयके भरण्यासाठी = मोबाईल ऍप, क्‍लाऊड सेवा बेस प्रणालीचा वापर

वीज देयके भरण्यासाठी मोबाईल ऍप, क्‍लाऊड सेवा
मुंबई  24 /11/2016 – 
मुंबईकरांची लाइफ लाइन असलेल्या बेस्टच्या देयकांचा भरणा, नवीन वीजेच्या मीटरची मागणी, विद्युत बिलांची माहिती, तक्रार नोंदणी पध्दती आता बेस्टने मोबाईल ऍपद्वारे विकसित केली आहे. दस्तऐवजांचे स्कॅनिंग, नवीन प्रकल्प, त्यांची अंमलबजावणी तसेच सद्याच्या प्रकल्पाची देखभाल आता डिजिटाईज होणार आहे. त्यासाठी क्‍लाऊड सेवा वेब प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

बेस्टच्या सर्व विभागाच्या संगणकीकृत प्रणालीचे आज बेस्ट समितीत सादरीकरण झाले. बेस्टच्या विविध विभागांमध्ये सद्या समन्वयाचा अभाव आहे. बेस्टचे कर्मचारी, प्रवाशी आणि ग्राहकांना सेवा सुविधा तत्पर मिळत नाहीत. बेस्टच्या एकूण कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे डिजिटायझेशनचा प्रभावी वापर आता केला जाणार आहे. त्यामुळे कार्यक्षमता वाढवून ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या आणि तत्पर सेवा देण्यासाठी बेस्टने आता पाऊल उचलले आहेत. कर्मचारी, बस देखभाल परिवहन विभाग, अभियात्रिका विभाग, वाहक आणि चालक यांच्या रजा पध्दती, कर्मचाऱ्यांची रजा पध्दती, अर्थसंकल्प, त्यातील तरतूदी, प्रकल्पांची देखभाल, नवीन वीज मीटरची मागणी, वीज देयके, तक्रार नोंदणी असे बेस्टच्या कामकाजाचे डिजिटायझेशन केले

जाणार आहे. यातील बहुतांश सुविधा मोबाईल ऍपद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याचे सादरीकरण बेस्ट समितीचे सदस्य आणि बेस्टचे महाव्यवस्थाप डॉ. जगदीश पाटील यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मनसेचे केदार होंबाळकर, शिवसेनेचे सुनील गणाचार्य तसेच समितीचे अध्यक्ष मोहन मिठबावकर आदींनी काही सुचनाही केल्या. त्यानुसार या यंत्रणेत सुधारणा केल्या जाणार आहेत.

बेस्ट उपक्रमाच्या दस्तऐवजांचे डिजिटायझेशन आणि स्कॅनिग करून बेस्टचा कारभार पेपरलेस करण्याचा निर्धार बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी व्यक्त केला आहे. हे काम नेट स्पायडर या कंपनीला देण्यात येणार आहे. जर्मन यंत्रसामुग्रीचा त्यासाठी उपयोग केला जाईल. पालिकेच्या दस्तऐवजांचे स्कॅनिंग आणि डिजिटायझेशन करण्याचे काम याच कंपनीला दिले आहे. दरमिनिटाला सुमारे 240 दस्तऐवजांचे स्कॅनिंग या मशीनच्या माध्यमातून केले जात असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Post Bottom Ad