मुंबई 29 Nov 2016 -
रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी जर उशिरा शेवटची लोकल चुकली तर पहाटे पहिल्या लोकल ची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते , आता मात्र अशा प्रवाशांसाठी बेस्ट धावून आली असून बेस्ट ने अशा रेल्वे चुकणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष रात्र फेऱ्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे
मुंबईच्या धमन्या समजल्या जाणाऱ्या रेल्वेरात्री मात्र १२ वाजल्यानंतर बंद होतात , त्यामुळे रात्री उशीरा कामावरून सुटणाऱ्या प्रवाशांना आपली शेवटची उशिरा ची रेल्वे चुकली तर पहाटे पर्यंत रेल्वे स्थानकावर थांबावे लागत असे , नाहीतर रेल्वे स्थानकाबाहेर येऊन टॅक्सी अथवा कोणत्याही खाजगी गाड्यातून जावे लागत असे , त्यापायी त्यांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत असे . त्यामुळे रात्री अशा प्रवाशांसाठी रात्री उशिरा बससेवा चालविण्यात यावी अशी मागणी सातत्याने प्रवाशांकडून होत होती .
प्रवाशांची हि मागणी लक्षात घेता बेस्ट ने गुरुवार १ डिसेंबर पासून रात्र प्रवाशांसाठी दादर स्थानक { पूर्व ] स्वामी नारायण मंदिर येथून गोराई . ओशिवरा . मुलुंड [ पश्चिम } व कोपरखराने साठी विशेष बससेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. . दादर हुन एक वाजून वीस मिनिटांनी शेवटची बोरिवली लोकल सुटते , त्यानंतर राती १ वाजून ४५ मिनिटांनी बेस्ट ची २०२ मर्यादित दादर स्थानक पूर्व ते गोराई आगार दरम्यान सुटेल , त्याचप्रमाणे २ वाजून २५ मिनिटांनी दादर स्थानक पूर्व ते ओशिवरा आगार दरम्यान ४ मर्यादित मार्गावर विशेष बस सुटेल . तसेच मध्य रेल्वेवर शेवटची रेल्वे दादर हुन १२. ५२ ला ठाणे लोकल सुटते . बेस्ट ची विशेष रात्र भर २ वाजून ३० मिनिटांनी मुलुंड स्थानक पश्चिम साठी सुटेल . तर पहाटे नवी मुंबईत जाण्यासाठी पहाटे ४ वाजता दादर स्थानक पूर्व येथून कोपरखैराणेसाठी ५२१ मर्यादित वर विशेष बस सुटेल .
या बस सेवांमुळे दादर माहीम पासून संपूर्ण स्वामी विवेकानंद मार्गावरील बोरिवली पर्यंत , तर सायन पासून ला बहादूर शास्त्री मार्गावरील मुलुंड पर्यंत व चेंबूर वाशी कोपरखैरणे पर्यंत प्रवाशांची चांगलीच सोया होणार आहे .