मुंबई 25/11/2016 - बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांना जलतरण विषयक अधिक सोयी सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने प्रत्येक परिमंडळामध्ये एक नवीन जलतरण तलाव बांधण्याबाबत जागा निश्चित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी परिमंडळीय आयुक्तांना (Zonal DMC) मासिक बैठकीत दिले होते. तसेच ही जागा निश्चित करताना ज्या विभागात आधीपासून महापालिकेचे जलतरण तलाव आहेत, ते विभाग वगळून जागा निश्चित करावी, असेही आदेश महापपालिका आयुक्तांनी दिले होते.यानुसार ७ परिमंडळांमध्ये जागा निश्चित करुन प्राथमिक प्रस्ताव नुकतेच सादर करण्यात आले आहेत. त्यानुसार पुढील आवश्यक कार्यवाही सुरु करण्याचे व प्रशासकीय प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी संबंधितांना दिले आहेत.
परिमंडळ १ मधील डी विभागांतर्गत येणा-या 'लेडी लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग' (Nepean Sea Road) येथील 'प्रियदर्शनी पार्क'येथे जलतरण तलाव प्रस्तावित करण्यात येत आहे. परिमंडळ २ मधील जी / दक्षिण विभागांतर्गत येणा-या व जलअभियंता विभागाच्या अखत्यारित असणा-या 'वरळी हिल रिझर्व्हॉयर' (Worli Hill Reservoir)येथे जलतरण तलाव प्रस्तावित करण्यात येत आहे. परिमंडळ ३ मधील के पूर्व विभागातील एका भूखंडावर जलतरण तलाव प्रस्तावित करण्यात येत आहे. परिमंडळ ४ मधील पी उत्तर विभाग कार्यालया जवळ असणा-या चाचा नेहरु मैदान परिसरात जलतरण तलाव प्रस्तावित करण्यात येत आहे. परिमंडळ ५ मधील एम पूर्व विभागांतर्गत येणा-या देवनार गावामध्ये (Village Deonar) एका मनोरंजन मैदानाच्या परिसरात जलतरण तलाव प्रस्तावित करण्यात येत आहे. परिमंडळ ६ मधील एस विभागांतर्गत येणा-या विक्रोळी पूर्व परिसरातील टागोर नगर मधील राजर्षी शाहू क्रीडांगणाच्या परिसरात जलतरण तलाव प्रस्तावित करण्यात येत आहे. परिमंडळ ७ मधील आर उत्तर विभागांतर्गत येणा-या दहिसर पश्चिम परिसरातील आर.टी.ओ. कार्यालयाजवळील भूखंडावर जलतरण तलाव प्रस्तावित करण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या ७ जलतरण तलाव आहेत. यामध्ये दादर (जी उत्तर विभाग) परिसरातील महात्मा गांधी स्मारक ऑलिंपिक जलतरण तलाव, घाटकोपर (एन विभाग) परिसरातील महापालिका जलतरण तलाव, चेंबूर (एम पूर्व विभाग) परिसरातील जनरल अरुणकुमार वैद्य जलतरण तलाव, कांदिवली (आर दक्षिण विभाग) परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलाव, दहिसर (आर उत्तर विभाग)परिसरातील श्री मूरबाळीदेवी जलतरण तलाव यांचा समावेश आहे. यापैकी चेंबूर व कांदिवली येथील तलावांचे सध्या नूतनीकरण सुरु आहे. त्याचबरोबर मुलुंड (टी विभाग) परिसरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल आणि अंधेरी पश्चिम (के पश्चिम विभाग) परिसरातील शहाजीराजे क्रीडा संकुल येथे देखील महापालिकेचे प्रत्येकी एक याप्रमाणे दोन जलतरण तलाव आहेत. या दोन्ही तरण तलावांचे देखभाल व व्यवस्थापन बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान यांच्यामार्फत केले जाते. या सर्व सात जलतरण तलावांचा लाभ मुंबईकर नागरिक मोठ्या प्रमाणात घेत असतात.