विधानपरिषद निवडणुकीतल्या विजयाने काँग्रेसचे संख्याबळ वाढलेः अशोक चव्हाण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 November 2016

विधानपरिषद निवडणुकीतल्या विजयाने काँग्रेसचे संख्याबळ वाढलेः अशोक चव्हाण

मुंबई दि. 22 नोव्हेंबर 2016 :
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने नांदेड आणि सांगली सातारा या दोन जागा जिंकल्याने विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे संख्याबळ एकने वाढले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सामंजस्याची भूमिका घेऊन आघाडी केली असती तर दोन्ही पक्षाला फायदा झाला असता अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

विधानपरिषद निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले की, विधानपरिषद निवडणुकासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली असती तर दोन्ही पक्षांच्या तीन-तीन जागा सहज निवडून आल्या असत्या मात्र राष्ट्रवादीने समजुदारपणाची भूमिका घेतली नाही, त्यामुळे आघाडी होऊ शकली नाही. आघाडीचा फायदा दोन्ही पक्षाला होणे अपेक्षित असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसने मागणी केलेल्या सांगली-सातारा आणि यवतमाळ या जागा काँग्रेसला सोडल्या असत्या तर निकालाचे चित्र वेगळे दिसले असते, मात्र राष्ट्रवादीने धर्मनिरपेक्ष विचारांना तिलांजली देऊन काँग्रेसला जागा सोडण्यापेक्षा शिवसेना आणि भाजपशी या जातीयवादी पक्षांशी अभद्र युती केली. अशा परिस्थितीतही काँग्रेस पक्षाने नांदेड आणि सांगली-साता-याच्या जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने समजुतदारपणाची भूमिका घेऊन जातियवादी पक्षाला मदत करणे टाळले असते तर योग्य झाले असते. राष्ट्रवादी काँग्रेसने या निकालातून धडा घेऊन भविष्यात शिवसेना भाजपला फायदा होऊ नये म्हणून योग्य भूमिका घ्यावी असे चव्हाण म्हणाले.

Post Bottom Ad