मुंबई / 22 Nov 2016 – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढत आहे वाहनांना रर-ते कमी पडत आहेत त्यातच बेदरकारपणे वाहन चालविल्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर अपघात होत असतात. ही अपघातांची संख्या कमी करण्यासाठी मुंबई पालिका आता पुढे सरसावली आहे. वाहतूक पोलिसांनी सूचविलेल्या उपाययोजनांनुसार पालिकेने पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग त्याचप्रमाणे मरीन ड्राइव्ह येथील नेताजी सुभाषचंद्र मार्गावर वाहनांची नंबर प्लेट दर्शविणारे स्वयंचलित कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ४० कॅमेरे या रस्त्यांवर लावण्यात येणार असून त्यासाठी पालिका चक्क दोन कोटी 45 लाख रुपये खर्च करणार आहे यामुळे बेदरकार वाहनचालकांना आता लवकरच चाप बसणार आहे.
मुंबईत लोक संख्या वाढत आहे त्याचप्रमाणे वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे वाहनांना रर-ते कमी पडत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहेत बेदरकार वाहनांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने रस्त्यांवर वाहनांची गती नोंदवून अधिक गती असणा-या वाहनांची नंबर प्लेट दर्शविणारे कॅमेरे बसवावेत अशी मागणी वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली होती. त्यानुसार पालिकेने एएनपीआर कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरीसाठी ठेवला आहे हे ४० कॅमेरे बसविण्याचे काम मेसर्स अजब मॅजिक टेक्नॉलॉजी प्रा.लि. या कंपनीला देण्यात आले आहे. यासाठी पालिकेला २ कोटी ४५ लाख ७१ हजार इतका खर्च अपेक्षित आहे. पुढील वर्षापर्यंत हे कॅमेरे या रस्त्यांवर लावले जाणार आहेत.
ई-चलनाद्वारे दंड आकारणीबेदरकारपणे वाहन चालविणा-यांना चाप लावण्यासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे त्यांचा नंबर प्लेटचा क्रमांकच कॅमेरे-यात कैद होणार आहे. आपण पकडलो गेलोय याची कल्पना संबंधित चालकाला नसली तरी थेट ईचलनच त्याच्याकडे पोहोचविले जाणार आहे. त्यानुसार दंडात्मक कारवाई होऊन बेदरकारपणाला आपोआपच लवकरच वेसण लागणार आहे.