मुंबई 25/11/2016 -
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटने द्वारे २६ नोव्हेंबर ते २६ जानेवारी हा कालावधी संविधान जागर महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत राज्यभरातून संविधान जागर यात्रा काढली जाणार आहे. हि यात्रा 2 टीम मध्ये विभागली असून यापैकी एक टीम मुंबई ते महू (मध्यप्रदेश) असा प्रवास करणार असून दुसरी टीम नागपूर ते औरंगाबाद असा प्रवास करणार आहे.
या प्रवासादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी संबंधित असणाऱ्या ठिकाणांना भेटी देऊन त्या परिसरात संविधानावर आधारित कार्यक्रम घेतले जाणार आहेत. तर याची सुरूवात उद्या मुंबईतील राजगृहापासून होणार असून दिवसभर सिद्धार्थ कॉलेज, आंबेडकर कॉलेज व इतर ठिकाणी व्याख्याने व कार्यक्रम पार पडणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता सर्वजण दादर येथील चैत्यभूमीवर जमा होतील. तिथे मान्यवरांच्या हस्ते यात्रेचे औपचारिक उदघाटन होईल.
महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर, नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी व इतर मान्यवर या कार्यक्रमात सर्वांना संबोधित करतील. संविधानावर आधारित गाणे, कार्यक्रम, पोस्टर प्रदर्शन याठिकाणी केले जाईल व यात्रेच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात होईल,