‘विल्सन’ आजारावरील औषधाच्या पुरवठ्यासाठी केंद्र शासनाचे औषध निर्मात्या कंपनीला सूचना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 November 2016

‘विल्सन’ आजारावरील औषधाच्या पुरवठ्यासाठी केंद्र शासनाचे औषध निर्मात्या कंपनीला सूचना

मुंबई, दि. 24/11/2016 : देशात आणि महाराष्ट्रात विल्सन (Wilson) या आजारावरील उपचारामध्ये आवश्यक असलेल्या D-Penicillamine या औषधाचा तुटवडा जाणवत असून रुग्णांना त्याचा पुरवठा व्हावा, यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून या औषधाच्या पुरवठ्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या औषध निर्मिती कंपनीने खास सोय केली आहे. त्यासाठी त्यांनी वेबसाईट, व्हाटसअप क्रमांक तसेच आणि ट्विटर हँडल सुरू केले आहे.

विल्सन या आजारावरील D- Penicillamine या औषधाचा देशात तसेच राज्यात मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत होता. त्यामुळे अनेक रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री बापट यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांना तातडीने पत्र पाठवून याविषयावर बैठक घेण्याची मागणी केली. त्यांच्या पत्राची दखल घेऊन नड्डा यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये बापट यांनी ही औषधे उपलब्ध होण्यासाठी केंद्र शासनाने तातडीने उपाय योजना करण्याची मागणी केली.

बापट यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दि. 8 नोव्हेंबर 2016 या औषधाचे निर्माते असलेल्या मे. पनासिया बायोटेक (Panacea Biotec) या कंपनीस औषध पुरवठ्यासाठी योग्य ती पावले उचलण्याच्या सूचना केल्या. या सुचनेनंतर कंपनीने रुग्णांच्या माहितीसाठी www.cilamin.com हे संकेतस्थळ तसेच आपत्कालीन स्थितीत औषध पुरवठ्यासाठी व उपलब्धतेसाठी 9350588528 हा व्हाटसअप ग्रुप आणि @cilamin250 हे ट्विटर हँडल व https://www.facebook.com/cliamine250 हे फेसबुक पेज सुरू केले आहे. या माध्यमातून रुग्णांना हे औषध कुठे उपलब्ध आहे, कसे मिळू शकेल तसेच कोणत्या औषध विक्रेत्याकडे हे औषध उपलब्ध आहे, त्याचा पत्ता अशी सर्व माहिती मिळणार आहे. औषधाची ऑनलाईन मागणीही वरील संकेतस्थळावर करता येणार आहे.

ज्या रुग्णांना उपलब्ध औषधाची आवश्यकता आहे, त्यांनी वरील माध्यमातून माहिती घेऊन औषधांची मागणी करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट यांनी केले आहे.

Post Bottom Ad