मुंबई / प्रतिनिधी 23 Nov 2016
मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील राणी बागेतील पेंग्वीनचा मृत्यू झाल्यावर याचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले होते. महापालिकेवर सर्विकडून टिका होत असताना विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी लोकायुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. याची दखल घेत लोकायुक्तांनी महापालिकेला फैलावर घेत या प्रकरणाची चौकशी सुरु केली असून २६ नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दक्षिण कोरियातून महापालिकेने हेम्बोल्ट जातीचे आठ पेंग्विन आणले होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या पेंग्वीनचे दर्शन मुंबईकरांना होणार होते, परंतु २३ ऑक्टोबर रोजी दीड वर्षांच्या डोरा नावाच्या पेंग्वीनचा मृत्यु झाला होता. पेंग्विन मृत्यूप्रकरणी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे. लोकायुक्तांकड़े तक्रार दाखल झाल्यावर लोकायुक्तांनी राणी बागेचा आढावा घेतला. तसेच या प्रकरणावर लोकायुक्तांसमोर सुनावणी सुरु आहे. त्यामुळे अखेर पालिका प्रशासनाने पेंग्वीन मृत्युप्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. उपयुक्त किरण आचरेकर या प्रकरणाची चौकशी करीत असून २६ नोव्हेंबरला अहवाल सादर होईल, हा अहवाल २९ नोव्हेंबर रोजी सुनावणीवेळी लोकायुक्तांपुढे सादर करण्यात येणार आहे. पेंग्वीनच्या मृत्युबरोबरच हे कंत्राट मिळवण्यासाठी ठेकेदाराने सादर केलेल्या बोगस कागदपत्रांचीही छाननी होणार आहे. ५० कोटी रुपयांचे कंत्राट मिळवण्यासाठी बोगस कागदपत्र सादर करणाऱ्या या कंपनीचे सुमारे १ कोटी ४० लाखाची अनामत रक्कम पालिकेने जप्त केली आहे.