निवडणुकीनंतर मुंबई अग्निशमन दलाचे कर्मचारी आंदोलन करणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 November 2016

निवडणुकीनंतर मुंबई अग्निशमन दलाचे कर्मचारी आंदोलन करणार

मुंबई / 29 Nov 2016
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या अग्निशमन दलामधील कर्मचारयांच्या विविध मागण्यासाठी निवडणुकीनंतर आंदोलन करण्याचा इशारा मुंबई फायर सर्व्हिसेस युनियनचे कार्याध्यक्ष महाबळ शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला. 
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेट्टी यांच्या सोबत शशांक राव व रमाकांत बने उपस्थित होते. यावेळी बोलताना 2009 पासून अग्निशमन दलामधील कर्मचारयांसाठी नविन PPA चे ड्रेस विकत घेतलेले नाहित. या ड्रेसचा कालावधी 2013-14 मध्ये संपला असून अद्याप नविन ड्रेस मिळाले नसल्याने कालबाह्य झालेले ड्रेस घालून काम करावे लागत आहे. आग विझवताना वापरले जाणारे मास्क काल बाह्य झाली आहेत. कर्मचारी गुदमरल्यास मशीनकडून माहिती मिळते अश्या मशीन काम करण्याच्या बंद झाल्या आहेत असे रमाकांत बने यांनी सांगितले.

एखाद्या ठिकाणी आग लागल्यावर त्या ठिकाणी जाई पर्यंत काय करावे यासाठी (Sop) नियमावली तयार केली आहे. परंतू घटनेच्या ठिकाणी गेल्यावर काय करावे यासाठी नियमावली Sop बनवलेली नाही. अग्निशमन दलामध्ये 300 पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे अद्याप भरली नसल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचारयांवर कामाचा बोजा येत आहे. कर्मचारी जे अतिरिक्त काम करत आहेत त्या अतिरिक्त कामाचा भत्ता कर्मचारयांना देण्यात आलेला नाही. अश्या अनेक मागण्या मान्य कराव्यात म्हणून गेले 4 वर्षे प्रयत्न करूनही मागण्या मान्य होत नसल्याने आंदोलना शिवाय पर्याय नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

Post Bottom Ad