शिवस्मारकाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करणार - मुख्यमंत्री - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

06 November 2016

demo-image

शिवस्मारकाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करणार - मुख्यमंत्री

Mantralaya_2
मुंबई, दि. 5 : मुंबईच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचा आराखडा तयार असून स्मारकाच्या कामाचे काटेकोर नियोजन करुन विविध कामाचे टप्पे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येणार आहेत. या माध्यमातून महाराष्ट्रातील व जगातील शिवप्रेमींचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे स्वप्न शासन लवकरच पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
शिवस्मारक संदर्भात आढावा बैठक शिवस्मारक कार्यालय कफ परेड येथे आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी फडणवीस बोलत होते. बैठकीला शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव भगवान सहाय, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, सचिव सी.पी.जोशी, मुख्य अभियंता हिमांशु श्रीमाळ, अधीक्षक अभियंता आर.टी.पाटील, कार्यकारी अभियंता डी.डी.बारवटकर, आर्किटेक्ट जाधव तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवस्मारकाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच याकरीता निविदा प्रक्रियेचे काम लवकरच पूर्ण करुन नवीन वर्षाच्या प्रारंभील स्मारकाच्या कामास सुरूवात होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. मेटे यांनी शिवस्मारकाचे काम लवकरच सुरू होणार असून यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.

Post Bottom Ad

Pages