मुंबई 28 Nov 2016 -
नोटबंदीच्या विरोधात आज संपूर्ण देशभर काँग्रेसतर्फे जन आक्रोश दिवस पाळण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर आज मुंबई मध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली जन-आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे सामान्य जनतेला ज्याप्रकारे त्रासाला सामोरे जावे लागते. स्वतःचे पैसे बँकेतुन काढण्यासाठी जे सामान्य जनतेला कष्ट सोसावे लागतात. त्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला जनतेचा, विविध संघटनांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या मोर्चात सामान्य जनतेने प्रचंड प्रमाणात सहभाग घेतला. काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, स्थानिक काँग्रेसचे नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. कालिना ते बांद्रा खेरवाडी जंक्शन असे या जन-आक्रोश मोर्चाचे स्वरूप होते. खेरवाडी जंक्शनजवळ या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले.
या मोर्चाला संबोधित करताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले की या मोर्चाला जे लोक उपस्थित होते ते कोणी काळे धन वाले नाहीत. ही सर्व सरकारच्या नोटबंदीच्या विचित्र व चुकीच्या निर्णयाने त्रस्त झालेली जनता आहे. जी सरकार विरोधात आक्रोश करण्यासाठी रस्त्यावर उतरलेली आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व देशाला अच्छे दिनचे स्वप्न दाखवले होते. जनधन योजनेच्या नावाखाली प्रत्येक नागरिकाचे बँकेत खाते उघडून त्यांच्या प्रत्येकाच्या खात्यात १५,००,००० रुपये टाकण्यात येणार असल्याची थाप सुद्धा त्यांनी सामान्य गरीब जनतेला मारली होती.

विदेशी बँकांमध्ये असलेले करोडो रुपयांचे काळे धन भारतात आणणार असे सुद्धा आश्वासन जनतेला दिले होते. पण यातील एक गोष्ट सुद्धा त्यांनी पूर्णत्वाला नेली नाही. उलटे होत्याचे नव्हते केले. नोटबंदीचा निर्णय घेऊन सामान्य जनतेचे स्व: कष्टाचे पैसे एका क्षणात मातीमोल केले. स्वतःचे पैसे बँकेतून काढण्यासाठी जनतेला बँकेबाहेर रांग लावावी लागत आहे. आजपर्यंत सुमारे ७० लोक या रांगांचे बळी ठरले आहेत. नरेंद्र मोदींचा हा निर्णय पूर्णपणे फोल ठरला आहे. जेवढे काळे धन वाले होते त्यांनी आपला काळा पैसा २० ते ३०% टक्के जास्त देऊन पांढरा करून घेतला. काही लोकांनी सोन्यामध्ये, विदेशी डॉलर मध्ये कन्व्हर्ट करून आपले काळे धन पांढरे केले. त्यांनी कधी बँकेच्या बाहेर रांग लावली नाही.
नरेंद्र मोदी जरी म्हणत असले की ५० दिवसात सर्व वातावरण सामान्य होईल. तरी ते शक्य नाही. कारण आपल्या देशात १७ लाख करोड रुपयांची करन्सी आहे. यातील ८६% करन्सी ही ५०० आणि १००० च्या नोटांमध्ये होती. पण याच नोटांवर बंदी आणल्यामुळे ते पैसे मातीमोल झाले आणि बँकांमध्ये सहजासहजी तो पैसा बदलणे शक्य नाही. हे पैसे बदलायला दर महिन्याला २३०० करोड रुपये करन्सीची गरज आहे आणि रिझर्व्ह बँकेची महिन्याला ३०० करोड रुपयांची करन्सी छापण्याची क्षमता आहे. त्यामुळे या त्रासातून मुक्तता मिळायला अजून सात महिने लागतील. त्यामुळे ही निव्वळ दिशाभूल आहे. हा निर्णय म्हणजे मोदींनी केलेला गुन्हा आहे आणि या गुन्ह्याची मोदींनी जाहीररीत्या माफी मागावी. नाहीतर या मोर्चाच्या निमित्ताने रस्त्यावर उतरलेली जनता या सरकारला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले नरेंद्र मोदी आणि सर्व भाजपचे नेते खोट्या घोषणा देतात आणि सामान्य जनतेची गळचेपी करतात. हा नोटबंदीचा निर्णय जबरदस्ती सामान्य जनतेवर लादला गेला आहे. जर या सरकारला धडा शिकवायचा असेल. तर या सरकारला आगामी निवडणुकीत तोंडघशी पाडून जनतेला सतवल्यावर काय होते ते दाखवायला हवे.
राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा या जन-आक्रोश मोर्चामध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आपल्या हजारॊ कार्यकर्त्यांसह या मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चाला संबोधित करताना ते म्हणाले की मोदी सरकारने या सत्तेत येऊन सामान्य जनतेच्या भल्यासाठी काही नाही केले आणि जर काही केले असेल तर फक्त एकच, जनतेला रांग लावायला शिकवले. बँकांच्या बाहेर ज्या रांगा लागतात, हा सामान्य जनतेचा उघड-उघड छळ आहे. यासाठी जनता या सरकारला कधीच माफ करणार नाही.
सदर जन-आक्रोश मोर्चात मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेशकाँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सचिन अहिर, माजी खासदार एकनाथ गायकवाड, खासदार हुसेन दलवाई, आमदार असलम शेख, वर्षा ताई गायकवाड, नसीम खान, माजी आमदार कृपाशंकर सिंह, चंद्रकांत हंडोरे, अशोक जाधव, चरणसिंह सपरा, मुंबई काँग्रेस सरचिटणीस संदेश कोंडविलकर, भूषण पाटील, सर्वस्वी मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, नगरसेवक / नगरसेविका, ब्लॉक अध्यक्ष, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.