शिवछत्रपतींचे आशीर्वाद आणि जनतेच्या विश्वासामुळे जिंकलो - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 November 2016

शिवछत्रपतींचे आशीर्वाद आणि जनतेच्या विश्वासामुळे जिंकलो - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद आणि केंद्र व राज्य सरकारच्या विकास कामांवर जनतेने दाखविलेला सार्थ विश्वास यामुळेच नगरपालिका निवडणुकीत दणदणीत विजय आम्ही संपादन करू शकलो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
राज्यासमोर अनेक आव्हाने होती. पण, त्याची सोडवणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या योजना आखते आहे, जे उपाय करते आहे, त्यावर राज्यातील जनतेने व्यक्त केलेले हे समाधान आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वातील सरकार सुद्धा गरिब आणि मध्यमवर्गीयांसाठी अनेक योजना राबवित आहे. त्यावर सुद्धा मतदारांनी अतिशय भरभरून यश आम्हाला दिले, याचा निश्चितच आनंद आहे. या यशात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आपल्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, पदाधिकारी आणि सर्वांत महत्त्वाचे कार्यकर्त्यांचे श्रेय अधिक आहे. या सर्वांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

नगरपालिका निवडणूक निकालातील ठळक नोंदी
नगरपालिका निवडणुकीत भाजपाला भक्कम यश
जवळजवळ तिप्पटीने जागा वाढल्या, 3510 निकालांपैकी एकट्या भाजपाच्या 851 हून अधिक जागा, भाजपा आघाड्यांनाही भक्कम यश
एकूण जागा 3705 (जवळजवळ 200 निकाल अद्याप अप्राप्त)
एकूण जागांपैकी उपलब्ध निकालातील एक तृतियांश जागा भाजपाने जिंकल्या
मुख्यमंत्र्यांच्या 40 सभांपैकी 33 ठिकाणी दणदणीत विजय
2011 च्या निवडणुकीत या पहिल्या टप्प्यात नगरसेवक पदासाठी भाजपाच्या होत्या केवळ 298 जागा
मोठा फटका : राष्ट्रवादी 916 वरून आली 551 वर, अर्ध्याने जागा घटल्या
2011 मधील निकालानुसार, 86 नगरपालिका अशा होत्या, ज्यात भाजपाचे अजीबात प्रतिनिधीत्त्व नव्हते!
26 नगरपालिका अशा होत्या, ज्यात भाजपाचा केवळ 1 किंवा 2 सदस्य होते.
एकूणच या पहिल्या टप्प्यातील 112 नगरपालिकांमध्ये भाजपा नगण्य होती.
त्यातून हे यश किती मोठे आहे, याचा सहज अंदाज यावा.

नगराध्यक्ष
भाजपाचे जवळजवळ 52 नगराध्यक्ष स्वबळावर निवडून आले आहेत. (पूर्वी केवळ 6 ते 7 ठिकाणी भाजपाचे नगराध्यक्ष होते.) त्यामुळे या एका वर्गवारीत हे यश 10 पट अधिक आहे.
5 ते 6 ठिकाणी भाजपा सहयोगी पक्षांचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत.
त्यामुळे 60 हून अधिक नगराध्यक्ष हे भाजपा आणि मित्रपक्षांचे आहेत.
भाजपा-शिवसेना युतीचा विचार करता जवळजवळ 80 नगराध्यक्ष हे युतीचे आहेत. एकूण निकालातील हे प्रमाण (55 टक्के)...

किती नगरपालिकांमध्ये कुणाची सत्ता:22 नगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता
21 नगरपालिकांमध्ये काँग्रेसची सत्ता
18 नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता
15 नगरपालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता
12 नगरपालिकांमध्ये स्थानिक आघाड्यांची सत्ता
26 नगरपालिकांमध्ये त्रिशंकू अवस्था

नगराध्यक्ष कुणाचे किती:भाजपचे 52 नगराध्यक्ष
शिवसेनेचे 23 नगराध्यक्ष
काँग्रेसचे 21 नगराध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसचे 19 नगराध्यक्ष
25 अपक्ष नगराध्यक्ष

Post Bottom Ad