संविधान दिनी मुंबईत भव्य बाइक ऱ्यालीचे आयोजन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 November 2016

संविधान दिनी मुंबईत भव्य बाइक ऱ्यालीचे आयोजन

24 डिसेंबरला मुंबईत संविधान गौरव बहुजन महामोर्चा
मुंबई / प्रतिनिधी - 24/11/2016
एट्रोसिटी कायद्याची कड़क अमलबजावणी करावी या मागणीसाठी संविधान गौरव बहुजन महामोर्चाच्या वतीने मुंबईमध्ये भव्य बाइक ऱ्यालीचे आयोजन केले गेले आहे. ही बाइक ऱ्यालीे 26 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार असून बाइक ऱ्यालीची सांगता दादर चैत्यभूमी येथे संविधान वाचन करून केले जाणार असल्याची माहिती डॉ. आशीष तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई मराठी पत्रकार संघ येथे संविधान गौरव बहुजन महामोर्चाच्या वतीने मुंबईमध्ये बाईक ऱ्याली, 11 डिसेंबरला परिषद व 24 डिसेंबरला मुंबईत काढल्या जाणार्या महामोर्चाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. तांबे बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत शशांक कांबले, अशोक कांबले, दादाभाऊ अभंग उपस्थित होते.

यावेळी बोलताना अद्याप 10 हजारपेक्षा जास्त बाईक या ऱ्यालीमध्ये सहभागी होणार आहेत. नवी मुंबई, व उपनगरमधील बाईक चेंबूर येथून कलानगर जाणार आहेत. तर पश्चिम उपनगरातील दहिसर येथून येणाऱ्या बाईक कला नगर येथे येणार आहेत. कलानगर येथून सर्व बाईक एकत्र दादर चैत्यभूम़ी येथे जाणार असून तेथे संविधान वाचन करून ऱ्यालीची सांगता होईल असे तांबे यांनी सांगितले. ही बाईक ऱ्याली असली तरी ऱ्यालीमध्ये बाईक बरोबरच रिक्षा व इतर चारचाकी गाडयाही सहभागी होणार असल्याचे उपस्थितांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

24 डिसेंबरमध्ये महामोर्चा 
एट्रोसिटी कायद्याची कड़क अमलबजावणी करावी या मागणीसाठी संविधान गौरव बहुजन महामोर्चाच्या वतीने मुंबईमध्ये महामोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामध्ये बौद्ध, बहुजन व मुस्लिम समाजातील लोक लाखोंच्या संखेने सहभागी होणार आहेत. या मोर्चाचे नेतृत्व बहुजन समाजातील मुली करणार आहेत. मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी राजकीय नेत्यांशी चर्चा झाली आहे. राजकीय नेते यामध्ये सहभागी केले जातील मात्र कोणत्याही नेत्याला स्टेजवर थारा नसेल असा खुलासा यावेळी करण्यात आला.

Post Bottom Ad