मुंबई महापालिकेवर निळा झेंडा फडकवा - आनंदराज आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 November 2016

मुंबई महापालिकेवर निळा झेंडा फडकवा - आनंदराज आंबेडकर

मराठा मोर्चा नंतर एकच मोर्चा काढून उत्तर द्या 
मुंबई / अजेयकुमार जाधव - 22 Nov 2016 
भारतात आरएसएस प्रणित मनू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान यामध्ये सामना सुरु झाला आहे. संविधान बदलण्याचे प्रयत्न सुरु असल्याने संविधान टिकेल कि नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे आता लढायची वेळ आली आहे. हि लढाई लढण्यासाठी सत्ता आवश्यक असल्याने येत्या महापालिका निवडणुकीमध्ये पालिका मुख्यालयावर निळा ध्वज फडकवा असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले.

मुंबईतील रमाबाई आंबेडकर नगर येथे सोमवारी (२१ नोव्हेंबर २०१६) रिपब्लिकन सेनेच्या वर्धापन दिना निमित्त आयोजित सभेत आनंदराज बोलत होते. यावेळी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान वाचवण्यासाठी आंबेडकरी जनतेने इतर कोणत्याही पक्षातील उमेदवारांना मते न देता आपल्या समाजातील भाऊ बहीण यांनाच मतदान करून नगरसेवक बनवावे असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी केले. मुंबई महापालिकेत परिवर्तन झाले कि असेच परिवर्तन विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळीही करून सत्ता ताब्यात घेता येईल असे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.

सध्या ५०० आणि १००० रुपयाच्या नोटा बंद केल्याने सामान्य लोक हवालदिल झाले आहेत. नरेंद्र मोदी यांनी एका झटक्यात १६ लाख कोटी रुपयांचे चलन रद्द करून हे सर्वात मोठे सर्जिकल स्ट्राईक केल्याचे म्हटले आहे. मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक केले असले तरी त्या ऑपरेशननंतर जी काळजी घ्याची असते ती काळजी घेण्यात मोदी आणि केंद्र सरकार अपयशी ठरले असल्याची टिका आनंदराज यांनी केली. देशात लोकशाही असून लोकशाहीमध्ये संसदेला सर्वोच्च महत्व आहे. सर्वोच्च अश्या संसदेलाही अंधारात ठेवून नोटा बंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला यामुळे संसदेच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. हा प्रकार म्हणजे मोदींची हिटलरशाही असल्याचे आनंदराज यांनी म्हटले आहे. यावेळी एड. संघराज रुपवते, काशिनाथ निकाळजे, भाई सावंत, जी. डी. गमरे, वसंत कांबळे, रमेश जाधव, दिपक जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

मराठा मोर्चा नंतर एकच मोर्चा काढून उत्तर द्या 
मराठा समाजाचे मोर्चे हे आमच्या तुमच्या विरोधात नसून ते सत्ताधारी आणि ब्राम्हण समाजाच्या विरोधात आहेत. मनुवाद्यांच्या हस्तकांनी प्रतिमोर्चा काढल्याने नाशिक मध्ये तणाव निर्माण झाला. बौद्ध समाजातील लोकांना अमानुष मारहाण करण्यात आली. अशी परिस्थिती उदभवू नये म्हणून प्रतिमोर्चे काढू नका असे आवाहन केले होते. मुंबईमध्ये मराठा समाजाचा मोर्चा होऊन गेल्यावर मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे. दोन वेगवेगळे मोर्चे काढल्याने आंबेडकरी चळवळीमध्ये फूट असल्याचे दाखवून देऊ नका. सध्या एससी, एसटी, ओबीसी, मुस्लिम समाज एकत्र आला आहे. यामुळे नवे समीकरण निर्माण झाले आहे. मराठा मोर्चा नंतर ८५ टक्के समाजाचा मोर्चा काढून ऍट्रॉसिटी आणि आरक्षणाबाबत चांगलेच उत्तर देता येऊ शकते. परंतू तरीही काही लोक आततायी पणा करत मुंबईमध्ये २४ डिसेंबरला मोर्चा काढणार आहेत. अश्या लोकांना आंबेडकरी जनतेने थारा देऊ नये असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे.

Post Bottom Ad