संविधान दिनानिमित्त मंत्रालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 November 2016

संविधान दिनानिमित्त मंत्रालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

मुंबई, दि. 25 /11/2016 : भारतीय संविधानाबाबत जनजागृती आणि सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी याकरिता मंत्रालयात आज मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार आज मंत्रालयातील परिषद सभागृहामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव बाजीराव जाधव, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संविधान प्रास्ताविकेचे वाचन
नागपूर :रामगिरी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संविधान दिनाचे औचित्य साधून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले . यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी संघातून विधान परिषदेवर निवडून आलेले परिणय फुके, विभागीय आयुक्त अनूप कुमार, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे,माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, उप जिल्हाधिकारी श्री. पांडे, प्रकाश पाटील आदी वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Post Bottom Ad