महानगरपालिका व नगरपालिकांची झाली 1 हजार 400 कोटींची कर वसुली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 November 2016

महानगरपालिका व नगरपालिकांची झाली 1 हजार 400 कोटींची कर वसुली

मुंबई, दि. 25 Nov 2016  : व्यवहारातून रद्द झालेल्या एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्याने राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांची विविध कर व थकबाकीपोटी विक्रमी 1 हजार 400 कोटी 77 लाख रुपयांची कर वसुली झाली आहे. सर्वाधिक कर वसुली 489 कोटी 61 लाख रुपये बृहन्मुंबई महानगरपालिकेची तर त्यानंतर पुणे महानगरपालिका 144 कोटी 52 लाख रुपये वसुली झाली आहे, अशी माहिती नगरविकास विभागाने दिली आहे. 

8 नोव्हेंबर 2016 च्या मध्यरात्रीपासून एक हजार व पाचशे रुपये मुल्यांच्या नोटा व्यवहारातून रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांनी त्यांच्या विविध करांचा भरणा व थकबाकी भरण्यासाठी या जुन्या चलनातील नोटा स्वीकारल्याने गेल्या पंधरा दिवसांत राज्यातील नागरीकांनी त्यांचेकडील थकीत करांचा मोठया प्रमाणात भरणा केला आहे.

महानगरपालिकानिहाय जमा झालेली रक्कम रुपये 
महानगरपालिकेचे नाव
24 नोव्हें पर्यंत जमा रक्कम
बृहन्मुंबई महानगरपालिका
489 कोटी 61 लाख
नवी मुंबई महानगरपालिका
57 कोटी 66 लाख
कल्याण-डोबिंवली महानगरपालिका
62 कोटी 67 लाख
मीरा-भाईंदर महानगरपालिका
70 कोटी 77 लाख
वसई- विरार महानगरपालिका
22 कोटी 96 लाख
उल्हासनगर महानगरपालिका
37 कोटी 18 लाख
पनवेल महानगरपालिका
कोटी 53 लाख
भिवंडी-निजामपूर महानगरपालिका
21 कोटी 55 लाख
पुणे महानगरपालिका
144 कोटी 52 लाख
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
42 कोटी 14 लाख
ठाणे महानगरपालिका
51 कोटी 75  लाख
सांगली-कुपवाड महानगरपालिका
18 कोटी 30 लाख
कोल्हापूर महानगरपालिका
13 कोटी 94 लाख
अहमदनगर महानगरपालिका
कोटी 93 लाख
नाशिक महानगरपालिका
23 कोटी 50 लाख
धुळे महानगरपालिका
14 कोटी 95 लाख
जळगांव महानगरपालिका
13 कोटी 63 लाख
मालेगांव महानगरपालिका
कोटी लाख
सोलापूर महानगरपालिका
27 कोटी 10 लाख
औरंगाबाद महानगरपालिका
16 कोटी 18 लाख
नांदेड-वाघाळा महानगरपालिका
17 कोटी 75 लाख
अकोला महानगरपालिका
कोटी 25 लाख
अमरावती महानगरपालिका
16 कोटी 20 लाख
नागपूर महानगरपालिका
32 कोटी 45 लाख
परभणी महानगरपालिका
94 लाख
लातूर महानगरपालिका
कोटी 77 लाख
चंद्रपूर महानगरपालिका
कोटी 81 लाख
राज्यातील सर्व नगरपालिका
(नगरपालिका प्रशासन संचालनालय)
160 कोटी 72 लाख
एकूण जमा रक्कम रुपये
1400 कोटी 77 लाख

याप्रमाणे व्यवहारातून रद्द झालेल्या जुन्या चलनाचा वापर करुन नागरीकांनी भरलेल्या करामुळे महानगरपालिका व नगरपालिकांची  विक्रमी हजार 400 कोटी 77 लाख रुपयांची कर वसुली झाली आहे.

Post Bottom Ad