स्वच्छ मुंबईसह घनकचरा व्यवस्थापनासाठी जर्मनीकडून सहकार्य - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

20 October 2016

demo-image

स्वच्छ मुंबईसह घनकचरा व्यवस्थापनासाठी जर्मनीकडून सहकार्य


.com/blogger_img_proxy/

मुंबई 20 Oct 2016 : स्वच्छ मुंबईसाठी आणि राज्यातील घन कचरा व्यवस्थापन, सांडपाणी निर्मुलन या प्रकल्पांमध्ये जर्मनीमधील शेल्विंग होल्स्टिन या राज्याचे सहकार्य मिळविण्यासाठी तेथील पर्यावरण मंत्री डॉ.रॉबर्ट हॅबेक व महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यात आज चर्चा झाली. यावेळी राज्यातील प्रकल्पांना बौद्धिक व तांत्रिक सहकार्य करण्याचे आश्वासन डॉ. हॅबेक यांनी दिले.

बैठकीस पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव सतिश गवई, प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे आदी उपस्थित होते. जर्मन शिष्टमंडळात सल्लागार जॉसका क्नुथ , उप वाणिज्य दूत गॅब्रियल बोनर, जोहनीस लांग, वित्त अधिकारी अशुमी श्रॉफ उपस्थित होते.

राज्यात 262 स्थानिक स्वराज्य संस्था असून, एकूण 6690 मेट्रिक टन घनकच-यावर प्रतिदिन प्रक्रिया केली जाते. मुंबई शहराचा विचार केला असता ९००० टन कच-याचे व्यवस्थापन एकाचवेळी करून त्यापासून वीजनिर्मीती करण्यासंदर्भात जर्मनीतील तंत्रज्ञानाचा कसा फायदा होईल यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. याचबरोबर शहरातील तसेच राज्यातील रूग्णालये, हॉटेल, घरातील सांडपाणी यावर प्रक्रिया करूनच ते समुद्रात सोडण्यासंदर्भात नवीन तंत्रज्ञानाचा कसा वापर होऊ शकतो, त्याचा मुख्यत्वे मुंबई आणि समुद्र किना-यावरील उद्योग आणि निवास संस्थांना पर्यावरणाच्या दृष्टीने कसा फायदा होईल याची माहिती कदम यांनी जाणून घेतली.

डॉ. हॅबेक यांनी राज्यात तसेच मुख्यत्वे मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासंदर्भात राज्याला बौद्धिक आणि तांत्रिक मदत करण्याचे आश्वासन देताना, विविध ऊर्जा प्रकल्पांविषयी जाणून घेण्यासाठी 50 जणांचे शिष्टमंडळ भारत दौ-यावर असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी गवई म्हणाले की, घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात राज्यात अनेक उपाययोजना राबविण्यात येत असून, नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जलदगतीने पर्यावरणाचे संतुलन राखण्यास कशी मदत होईल यासंदर्भात राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगीतले.

Post Bottom Ad

Pages