मुंबई 14 Oct 2016 - मुंबई महानगरपालिकेतील प्रमुख सुरक्षा रक्षक दत्तात्रय हरिशचंद्र पाटील [ पिंपळे जुने गाव } याने शाळा सोडल्याचा बनावट दाखल पालिकेत सादर करून तसेच हाच दाखला उच्च न्यायालयातही सादर करीत पालिकेची आणि उच्च न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पालिका आयुक्तांनी पिंपळे याची चौकशी करून त्याच्यावर निलंबन अथवा बडतर्फीची कारवाई करावी , अशी मागणी हिंदुस्थान मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार एड . पराग आळवणी व सरचिटणीस संजय कांबळे बापेरकर यांनी केली आहे.
सध्या पालिकेत प्रमुख सुरक्षा अधिकारी या पदावर कार्यरत असलेले दत्तात्रय पाटील यांनी जातीचे बनावट बोगस प्रमाणपत्र तयार करून पालिकेत नोकरी मिळविली , याबाबत प्रमुख अधिकारी [ चौकशी ] यांनी ३० डिसेंबर १९८५ रोजी प्रमुख लेखापाल खात्यास लेखी कळविले होते . या अनुषंगाने संबंधित खात्याने २ डिसेंबर ८६ रोजी दत्तात्रय पाटील यांना तालुका तहासीलदार यांचे जातीचे मूळ प्रमाणपत्र १५ दिवसात सादर करा अन्यथा सेवेतून बडतर्फ करण्यात येईल असा ' लेखी मेमो " दिला होता . यावर पाटील याने मेमोला उत्तर न देता उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केली , यावेळी त्याने बनावट दाखल्याचा वापर करून उच्च न्यायालयाचीही फसवणूक केली .
याच दरम्यांन दामोदर गोविंद पाटील या पाटील नावाच्या साधर्म्य असणाऱ्या कर्मचाऱ्याने उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केले होते , त्यावेळी दत्तात्रय पती याच्या वकिलाने उच्च न्यायालयास दत्तात्रय हरिश्चंद पाटील याची केस दामोदर गोविंद पाटील यांच्याप्रमाणे असण्याचे खोटे दर्शवून न्यायालयाची फसवणूक केली , दामोदर गोविंद पाटील या इसमाच्या प्रार्थमिक व माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखल्यात बंजारा हा उल्लेख आढळला होता त्याचा फायदा दत्तात्रय पाटील याने उठवला , या गैरसमजुतीमुळे the fact here are admittedly similer to writ petition no ३३५७ of १९८६ असे नमूद केले.
>
या आधारावर दत्तात्रय पाटील याची जात पडताळणी करण्याची आवश्यकता नाही व केल्यास कंटेंम ऑफ कोर्ट होईल , अशा समजुतीने १९८७ पासून आजतागायत दत्तात्रय हरिश्चंद्र पाटील याची जात पडताळणी करून घेण्यात आलेली नाही , मुळात शासकीय आदेशानुसार जात पडताळणी प्रत्येक कर्मचाऱ्यास बंधनकारक असताना पाटील याने आपल्या अर्थनीतीमधून जात पडताळणी टाळण्यात यश मिळविले . तसेच उच्च न्यायालयानेही दत्तात्रय हरिशचंद्र पाटील { पिंपळे} याची जात पडताळणी करण्याची आवश्यकता नाही असे अंतरिम आदेशात कुठेही नमूद केले नसताना पालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे पाटील याना मोकळीक मिळाली आहे .
ह्या प्रकरणी राज्यपालांच्या सूचनेवरून पोलिसांनी चौकशी केली असता दत्तात्रय पाटील { पिंपळे} याच्या माध्यमिक शाळा सोडल्याच्या दाखल्यात दिनांक ६ जून १९७६ च्या मूळ प्रमाणपत्रात बंजारी असा स्पष्ट उल्लेख आहे, पाम केंद्र , तालुका पालघर, जिल्हा ठाणे प्रार्थमिक शाळा सूची न १ दिनांक ९ फेब्रुवारी २००२ च्या उताऱ्यात वंजारी असा उल्लेख आहे. पाम कुंभावली हायस्कुल , पालघर या माध्यमिक शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये वंजारी असा उल्लेख आढळला. आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पालघर येथे जाऊन सदर कागदपत्रे हस्तगत केली असता हे सर्व समोर आले आहे. या तपासावरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात पाटील याच्या विरोधात कलाम ४६५ , ४६७ ४६८ , ४७१ , ४२० या कलमाखाली गुन्हा दाखल केला. पाटील याने पालिकेची आणि उच्च न्यायालयाची फसवणूक केल्याचे एफ़ आय आर मध्ये स्पष्ट पणे नमूद केले आहे. आणि पाटील याने वंजारी हि जात असताना बंजारा जातीचे बनावट जात प्रमाणपत्र केल्याचे पॊलिसांनी पालिका आयुक्तांना लेखी कळविले आहे . मात्र आयुक्तांनी या प्रकरणी कुठलीही चौकशी केली नसून पाटील याला अभय देण्याचेच काम केले असल्याचा आरोप अळवणी यांनी केला आहे.
गुन्हा दाखल होताच अटक टाळण्यासाठी पाटील हे तीन चार दिवस गायब झाले होते आणि या कालावधीत त्याने ७ एप्रिल १६ रोजी अटकपूर्व जामीन मिळविला , सध्या पाटील ह्याला दर सोमवारी आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजेरी द्यावी लागत असून अशा कर्मचाऱ्यास बढती देऊन पालिकेतील सत्ताधार्यांनी साथ दिली आहे.
दत्तात्रय हरिश्चंद्र पाटील [ पिंपळे] हे लाच लाचलुचपत प्रकरणी रंगेहाथ पकडल्यामुळे सुमारे सहा वर्षे प्रोबेशन पिरियडमध्ये निलंबित होते , पालिकेच्या सेवानियम कलाम १९ { क ] अन्वये परिविक्षाधीन कालावधीत निलंबित झाल्याने सेवेतून बडतर्फ करणे आवश्यक होते . मात्र अशा भ्रष्ट अधिकाऱ्यास स्वीय सहाय्यक , उपयुक्त [ सा .प्र ] व अतिरिक्त आयुक्त [ पु . उ ] याच्या आशीर्वादाने प्रमुख सुरक्षा अधिकारी पदावर बढती देण्यात आली असण्याचा आरोप हिंदुस्थान मजदूर संघाचे अध्यक्ष ऍंड . पराग आळवणी आणि सरचिटणीस संजय कांबळे बापेरकर यांनी केलं आहे.