राज्यातील वसतिगृहांचा अहवाल सादर करावा - राजकुमार बडोले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 September 2016

राज्यातील वसतिगृहांचा अहवाल सादर करावा - राजकुमार बडोले

मुंबई, दि. 21 : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत राज्यातील वसतिगृहांकडून विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी-सुविधा देण्यात येतात किंवा कसे, हे पाहणी करुन तपासावे. राज्यातील वसतिगृहांची पाहणी करुन अहवाल सादर करावा, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज दिले.
मंत्रालयामध्ये आयोजित बडोले यांच्या दालनात झालेल्या वसतिगृहातील समस्या व मागण्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अवर सचिव समाजकल्याण अनिल अहिरे, उपसचिव समाजकल्याण डी.एल.स्थूल, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त विजया पवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी छाया गाडेकर तसेच समाज कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. राज्यातील वसतिगृहांचा आढावा घेऊन जिल्हानिहाय वसतिगृहांची मंजुरीची तारीख व संख्या जाहीर करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. अनधिकृत वसतीगृहांवर चौकशी करुन त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, असेही ते म्हणाले.

Post Bottom Ad