मुंबई । प्रतिनिधी 22 Sep 2016
सोलापूर जिल्ह्यातील वाळु उत्खननात शासकीय नियमांचा भंग करत बेकायदेशीर वाळू उत्खनन करण्यासाठी ठेकेदारास सहकार्य केल्याप्रकरणी तसेच चारा छावण्यांतील भ्रष्टाचार प्रकरणी विद्यमान विभागीय कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे आिण परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम या आयएएस अधिकाऱ्यांना फडणवीस सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कदम गुरुवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला.
तुकाराम मुंढे सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी शासकीय नियम व पर्यावरण अनुमतीतील अटी व शर्तीचा भंग करुन माण नदीमधील बेकायदेशीर वाळू उत्खननप्रकरणी ठेकेदारांस तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सहकार्य केले होते. त्यासंदर्भात सोलापूरच्या नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या गुन्हे आणि दंडात्मक कारवाईची कागदपत्रे कदम यांनी पत्रकारांना दिली.
प्रवीण गेडाम सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना २०१२-१३ मध्ये सांगोला तालुक्यातील ६६ चारा छावण्यांमध्ये भ्रष्टाचार झाला होता. त्याबाबत आरोप झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ ३ कोटी रुपये इतकी संस्थांवर दंडात्मक कारवाई केली होती. मात्र जिल्हाधिकारी गेडाम यांनी दोषी अधिकाऱ्यांना पाठिशी घातले आणि छावण्या चालवणाऱ्या संस्थावर कारवाई केल्यासंदर्भातील कागदपत्रे पत्रकारांना देण्यात आली.

सोलापूर जिल्ह्यातील या दोन्ही प्रकरणात तत्कालीन पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दोषी अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही कदम यांनी केला. सध्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील विरोधी पक्षात असताना, त्यांनी २०१३ च्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. तेच पाटील सध्या मात्र कारवाईस टाळाटाळ करत आहेत, असेही कदम यांनी सांगितले. फडणवीस सरकारने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही, तर आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे कदम यांनी पत्रकारांना सांगितले.