२५ सप्टेंबरला मुंबईत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 September 2016

२५ सप्टेंबरला मुंबईत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

मुंबई / प्रतिनिधी - रविवार, दिनांक २५ सप्टेंबर, २०१६ रोजी संपूर्ण बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ० ते ५ वर्षे वयाच्या सुमारे ११ लाख बालकांना ४ हजार ८०० तात्पुरत्या लसीकरण केंद्रांमार्फत पोलिओची मोफत लस पाजण्यात येणार आहे.
तसेच रविवार, दिनांक २५ सप्टेंबर, २०१६ रोजी ज्या बालकांना पोलिओचा डोस मिळालेला नाही, त्यांना दिनांक २६ ते ३० सप्टेंबर, २०१६ या दिवसांदरम्यान त्यांच्या घरोघरी जाऊन लस पाजण्यात येईल. त्यासाठी अंदाजे ५००० लसीकरण चमू असतील. दिनांक २९ मे, २०१६ रोजी झालेल्या पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम अंतर्गत १० लाख २१ हजार ४५० बालकांना पोलिओची लस पाजण्यात आली होती. तरी सर्व पालकांना महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात येते की, हा कार्यक्रम यशस्वी करण्यात सक्रिय सहभागी होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे व पोलिओ उच्चाटन करण्यात सिंहाचा वाटा उचलून आपल्या बालकांचे संभाव्य पोलिओपासून संरक्षण करावे.

Post Bottom Ad