मुंबई, दि. 22 : ब्राझीलमधील रियो दी जेनेरियो येथे नुकत्याच झालेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत भारताला पदक मिळवून देऊन देशाची मान उंचावणाऱ्या खेळाडूंना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या व महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ यांच्या वतीने ‘दिव्यांग खेलरत्न पुरस्कार’ देण्यात येणार असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे सांगितले.
मंत्रालयात आयोजित महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाच्या वतीने आयोजित बैठकीत बडोले बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, अपंग वित्त व विकास महामंडळाचे उपसचिव दी. रा. डिगळे, अपंग कल्याण विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
बडोले म्हणाले की, रियो येथे झालेल्या पॅरालिंम्पिक 2016 मध्ये विविध खेळात या दिव्यांग खेळाडूंनी चमकदार कामगिरी करुन देशाला चार पदके मिळवून दिली आहे. या चौघांनाही राज्य शासनाच्या वतीने दिव्यांग खेलरत्न पुरस्कार, रोख रक्कम देण्यात येणार आहे. सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूस 5 लाख, रौप्य पदक प्राप्त खेळाडूस 3 लाख तर कांस्य पदक विजेत्या खेळाडूस 2 लाख रुपये बक्षीस स्वरुपात देण्यात येणार असल्याचेही बडोले यांनी यावेळी सांगितले.