डेंग्यू - मलेरिया प्रतिबंधाच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाचा निर्णयमुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात डेंग्यू व मलेरिया विषयक प्रतिबंधात्मक कार्यवाही अधिक प्रभावीपणे करता यावी, या दृष्टीने २८५ अतिरिक्त कंत्राटी मनुष्यबळ घेण्याचा आणि ७ वाहन विराजीत धुम्रफवारणी यंत्रांबाबत मुदतवाढ देण्यास आज फेरफार समितीच्या बैठकीमध्ये (Variation Committee) प्रशासकीय स्तरावर मान्यता देण्यात आली आहे. तसेच डेंग्यू - मलेरियाबाबत अधिक प्रभावी जनजागृती व्हावी यादृष्टीने महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये नागरिकांना माहिती देणारे प्रदर्शन तातडीने सुरु करावेत, असेही आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी कीटकनाशक खात्याला दिले आहेत.
डेंग्यू - मलेरियाबाबत प्रतिबंधात्मक कार्यवाही तसेच याबाबत नियंत्रणाच्या दृष्टीने विशेष कार्यक्रम राबविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून स्वयंसेवकांच्या सेवा घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. यानुसार ६१४ स्वयंसेवक सध्या कार्यरत आहेत.
प्रतिबंधात्मक व नियंत्रणाची कार्यवाही अधिक प्रभावीपणे करता यावी यासाठी २८५ इतक्या संख्येने अतिरिक्त स्वयंसेवकांच्या सेवा घेण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी फेरफार समितीच्या स्तरावर विचाराधीन होता. या प्रस्तावास महापालिका आयुक्त महोदयांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली आहे.
यानुसार ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत २८५ अतिरिक्त कामगार घेण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. यासाठी किमान वेतन कायद्यानुसार यथोचित मानधन संबंधित स्वयंसेवकांना त्यांच्या स्वयंसेवी संस्थेमार्फत देण्याचे अपेक्षित आहे. यासाठी महापालिकेच्या स्तरावर २ कोटी ८५ लाख ५३ हजार १३९ रुपये व ८५ पैसे इतका खर्च अंदाजित आहे.
महापालिकेच्या सर्व ७ परिमंडळांमध्ये वाहन विराजीत धुम्रफवारणी यंत्रांच्या माध्यमातून धुम्रफवारणी केली जाते. या यंत्रांचे परिरक्षण व परिचालन करण्याबाबतच्या कंत्रांटाचा कालवधी वाढविण्यास देखील आजच्या बैठकी दरम्यान प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी महापालिकेच्या स्तरावर रुपये २९ लाख ३१ हजार ४५६ एवढा खर्च अंदाजित आहे.
डेंग्यू - मलेरियाबाबत प्रतिबंधात्मक कार्यवाही नागरिकांना त्यांच्या स्तरावर देखील करता यावी, यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये नागरिकांना डेंग्यू - मलेरियाबाबत माहिती देणारे प्रदर्शन तातडीने सुरु करण्यात यावे, असेही आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांना दिले आहेत.
महापालिका आयुक्त हे फेरफार समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यानुसार महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या फेरफार समितीच्या बैठकी दरम्यान सदर प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे, मुख्य लेखापाल (वित्त) ह. शं. निकम, कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.