बौद्धांना स्वतंत्र मतदारसंघ द्या - सचिन खरात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 September 2016

बौद्धांना स्वतंत्र मतदारसंघ द्या - सचिन खरात

मुंबई / प्रतिनिधी - राज्यात आणि देशात बौद्ध, दलित समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहेत. अन्याय अत्याचार होत असताना त्यांचे प्रश्न संसदेत आणि विधिमंडळात मांडणारे लोकप्रतिनिधी नसल्याने बौद्ध आणि दलितांना स्वतंत्र मतदार संघ द्यावेत अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. या मागणीसाठी येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खरात यांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्या मध्ये मराठा समाजाचे मोर्चे निघत आहे मोर्च्या मधे कोपर्डि प्रकरण, ऐट्रोसिटी कायदा, व आरक्षण या विषयाची चर्चा केली जात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशात सर्वाना आपाल्या मागणीसाठी घटनेच्या माध्यमातून प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. आज महाराष्ट्रात जे मराठा समाजाचे आंदोलन चालले आहेत त्या अंदोलना मधे ऐट्रोसिटी रद्द करा असे फलक दिसतात व निवेदनामधे ऐट्रोसिटी कायद्यात बदल करा असे म्हणतात या मोर्च्यात आंबेडकरी विचारांचे विरोधक व राखीव मतदार संघातून निवडून आलेले सदस्य ऐट्रोसिटी कायद्यात बदल करण्यासाठी मदत करीत आहेत. या खासदरानी व आमदरानी संसदेत अथवा विधिमंडळात दलितांच्या प्रश्नावर कधीच आवाज उठविला नाही हे सदस्य संविधानाच्या माध्यमातून अनुसूचित जातीचे फायदे घेतात मात्र दलित बहुजन आंबेडकरी विचार विरोधी काम करतात. जालनाचे आमदार संतोष सांभरे नाशिकचे अभिजीत घोलप सोलापुरच्या प्रनिती शिंदे यांनी पत्रक काढून या मराठा मोर्चाच्या मागण्याना पाठींबा दिला आहे. राहुल शेवाळे, कृपाल तुमाने भाऊसाहेब लोखंडे व रविन्द्र गायकवाड़ हे आरक्षणाला विरोध करणाऱ्या पक्षाचे सदस्य आहेत. यांनी कधीही दलितांच्या अन्ययाला वाच फोडली नाही असे खरात यांनी म्हटले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मतदार संघ मागताना सांगितले होते की, राखीव मतदार संघात दलित विरोधी व सवर्ण पक्षाचे मंडळी निवडून येतील व ते सदस्य आपल्या समाजाच्या प्रश्न न माड़ता ज्या पक्षाचे सदस्य आहेत त्या पक्षाच्या तत्वाप्रमाणे वागतील. असेच हे आमदार खासदार सवर्ण व दलित विरोधी विचारांच्या मतदारांनी निवडून आलेले आहे व आज बाबासाहेबांचे विचार खरे ठरवले आहेत. आज हिंदुत्ववादी व संविधानाला न माननारे पक्षाचे भाजपा, शिवसेना, पक्षाचे सदस्य संसदेत व विधिमंडळात जास्तीत जस्त निवडून येत आहेत. या सदस्यांचा बौद्ध व दलितांना काहीही उपयोग होत नसल्याने संसदेत व विधिमंडळात बौद्ध व दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी खरात यांनी केली आहे. स्वतंत्र मतदार संघामुळे बौद्ध व दलित मतदान करून आपल्या समाजातील प्रतिनिधी निवडून आणतील ते प्रतिनिधी दलितांचे प्रश्न मांडणारे असतील हिंदुत्ववादी किंवा विषमतावादी नसतील असे खरात यांनी म्हटले आहे.

Post Bottom Ad