छत्रपती शिवाजी महाराज यांचा (२४ सप्टेंबर) शाक्त राज्याभिषेक महोत्सव - संभाजी ब्रिगेड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 September 2016

छत्रपती शिवाजी महाराज यांचा (२४ सप्टेंबर) शाक्त राज्याभिषेक महोत्सव - संभाजी ब्रिगेड

सोहळ्यास पन्नास हजार मुस्लीम बांधवांची उपस्थिती
मुंबई । प्रतिनिधी 22 Sep 2016
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आजपर्यंत केवळ वैदीक राज्यभिषेक साजरा केला जात असे, परंतु यंदा प्रथमच शाक्त राज्याभिषेकही रायगडावर साजरा होणार असून शनिवारी (२४) होत असलेल्या या सोहळ्यास पन्नास हजार मुस्लीम बांधवांची उपस्थिती राहील असे नियोजन मराठा सेवा संघाच्या छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडने केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वैदीक आणि शाक्त असे दोन राज्याभिषेक झाले होते. पहिला काशीच्या गागाभट्टाने तर दुसरा निश्चलपुरी गोसावी यांनी केला होता. आजपर्यंत हिंदुत्वावादी संघटना वैदीक राज्याभिषेक धामधुमीत साजरा करत आलेल्या आहेत. यंदा प्रथमच मराठा सेवा संघाने शिवाजी महाराजांचा शाक्त राज्याभिषेक रायगडावर साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेले आठ महिने मी राज्यातल्या मुस्लीम तरुणांना मुस्लीम ब्रिगेडच्या झेंड्याखाली संघटीत करण्याचे काम करत आहे, सुमारे पन्नास हजार मुस्लीम तरुण शाक्त राज्याभिषेकास येतील असे छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगडचे अध्यक्ष सुभान अली शेख यांनी सांगितले.

शाक्त राज्यभिषेकाच्या सोहळ्यास शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष अर्जून तणपुरे, इतिहासकार श्रीमंत कोकाटे, व्याख्याते अमोल मिटकरी, सुधीर भोसले, मनोज आखरे, मधुकर मेहकरे, बाळकृष्ण परब आदी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थीत असणार आहेत. या सोहळ्यासाठी अखिल भारतीय शाक्त राज्याभिषेक सोहळा समिती स्थापन करण्यात आली आहे.

भिडे यांचे कार्यकर्तेही जाणार
६ जून रोजी होणाऱ्या छ. शिवाजी महाराजांच्या वैदीक राज्यभिषेकास सांगलीच्या संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार राहिला आहे. संभाजी ब्रिगेड करत असलेल्या शिवरायांच्या २४ सप्टेंबरच्या शाक्त राज्यभिषेकास विरोध करण्यासाठी भिडे यांचे कार्यकर्ते रायगडावर जाणार असल्याची माहिती आहे

Post Bottom Ad