मतदार नोंदणी अभियानामध्ये जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी होण्यासाठी आढावा बैठक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 September 2016

मतदार नोंदणी अभियानामध्ये जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी होण्यासाठी आढावा बैठक

मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ च्या अनुषंगाने नवीन मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी व्हावी यासाठी दिनांक १५ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर, २०१६ या कालावधीत मतदार नोंदणी अभियान बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असून या अभियानाच्या यशस्वीतेसाठी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चेन्ने, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख, उपायुक्त (करनिर्धारक व संकलक) डॉ. बापू पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई शहर व उपनगरातील निवडणूक निर्णय अधिकाऱयांची बैठक महापालिका मुख्यालयात आज (दिनांक २२ सप्टेंबर, २०१६) पार पडली.

यामध्ये ज्या मतदारांची नावे यापूर्वीच्या मतदार यादीमध्ये होती, परंतु आताच्या मतदार यादीमध्ये नाहीत अशा गहाळ झालेल्या नावांची शहानिशा करुन संबंधित मतदार यादीत त्याच्या नावाची नोंद करणे त्याचप्रमाणे वाढलेल्या लोकसंख्येप्रमाणे मतदार नोंदणी होण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱयांनी आपल्या विभागांमध्ये त्या दृष्टीने प्रयत्न करणे इत्यादी बाबत मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित असलेल्या अधिकाऱयांनी मतदार नोंदणी अभियानाबाबात सविस्तर चर्चा केली. मुंबई शहर व उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका यांच्यामध्ये योग्य तो समन्वय ठेवून मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले. दिनांक १ जानेवारी, २०१७ रोजी ज्यांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होणार आहेत अशा नवीन मतदारांनी आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहनही मान्यवरांनी यावेळी केले.

Post Bottom Ad