मुंबई – महावितरण विज पुरवठादार शासकीय कंपनीच्या कार्यक्षेत्रात विजेची उपकरणे हाताळताना आणि सुरक्षा उपकरणांचा योग्य वापर न केल्याने राज्यभरात तब्बल ८५२ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यात ‘महावितरण’चे ४४ कर्मचारी असून ८०८ सामान्य नागरिक आहेत. तसेच गंभीर जखमीं झालेल्यांची संख्याही ५६३ आहे.
"महावितरण"चे सव्वादोन कोटींहून अधिक वीज ग्राहक आहेत. ग्रामीण भागात खांबावरूनच उघड्या वीजवाहिन्यांच्या मदतीने वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे वादळवार्यात वीजखांब कोसळून नागरिकांना प्राण गमवावे लागत आहेत. तसेच वीजवाहिन्यांमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करत असताना आवश्यक त्या सुरक्षा उपकरणांचा वापर करण्यास कर्मचारी टाळाटाळ करतात. त्यामुळेच महावितरणच्या ४४ कर्मचार्यांचे बळी गेले आहेत. तसेच बेकायदेशीरपणे वीजवाहिनीवर वायर्सचे हूक टाकणे, निकृष्ट दर्जाच्या उपकरणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. ७६७ प्राणी ठार वर्षभरात प्राण्यांचेही ७६७ एवढ्या मोठ्या प्रमाणात बळी गेले आहेत. खांबावरील वीजवाहिनी कोसळल्याने हे अपघात होत आहेत. यामध्ये बैल, गाई आणि म्हशींची संख्या मोठी आहे. विजेच्या धक्क्याने सर्वाधिक बळी बारामती परिमंडळात गेले आहेत.