मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीकरीता महापालिका शाळा, अनुदानित व विना अनुदानित खासगी प्राथमिक शाळांतील आदर्श शिक्षकांना देण्यात येणारे ‘महापौर पुरस्कार’ प्रदान समारंभ मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते; महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि गृहनिर्माण, उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या विशेष उपस्थितीत तसेच शिक्षण समिती अध्यक्षा हेमांगी वरळीकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, दिनांक २२ सप्टेंबर, २०१६ रोजी सकाळी १०.३० वाजता मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृह, विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभास खासदार व शिवसेना सचिव अनिल देसाई, स्थानिक खासदार व भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पूनम महाजन; मुंबईच्या उप महापौर अलका केरकर, महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना सन्माननीय पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. स्थानिक आमदार पराग अळवणी, आमदार भाई जगताप, सभागृह नेता तृष्णा विश्वासराव, विरोधी पक्षनेता प्रवीण छेडा, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, महापालिकेतील सर्व विविध पक्षीय गटनेते, विविध वैधानिक व विशेष समित्यांचे अध्यक्ष, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, ‘के/पूर्व’ प्रभाग समिती अध्यक्षा तथा स्थानिक नगरसेविका शुभदा पाटकर, उप आयुक्त (शिक्षण) रणजित ढाकणे, सर्व नगरसेवक / सर्व नगरसेविका, सर्व नामनिर्देशित नगरसेवक /नगरसेविका यांना या समारंभास सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.