मुंबई - हेल्मेट घातले नाही म्हणून कारवाई करणाऱ्या विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका खोत (३०) यांना एका महिलेने पोटात लाथ मारून श्रीमुखात भडकावत मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी विलेपार्ले परिसरात घडला. हेल्मेट न घातल्याप्रकरणी खोत यांनी या महिलेला अडविले. त्यानंतर हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरती सुरेश पाटलेकर (२७) आणि तिचा मोठा भाऊ सुदर्शन सुरेश पाटलेकर (३०) यांना अटक केली आहे. ज्याने खोत यांना बघून घेईन अशी धमकी दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी अधीक चौकशी सुरु आहे.
Post Top Ad
06 September 2016
Home
Unlabelled
हेल्मेट सक्तीवरुन पार्ल्यात महिला पोलिसाला महिलेची मारहाण
हेल्मेट सक्तीवरुन पार्ल्यात महिला पोलिसाला महिलेची मारहाण
Post Bottom Ad
JPN NEWS
'जेपीएन न्यूज' हे २०१२ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांच्या समस्या, ताज्या घडामोडी, राजकारण, मंत्रालय, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बातम्यांना प्रसिद्धी दिली जाते.