मुंबई दि. 27 : माजी सैनिकांची पाल्य/विधवा यांना प्रधान मंत्री शिष्यवृत्ती योजना लागू आहे. मान्यता प्राप्त व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी सन 2016-17 मध्ये प्रवेश घेतलेल्या माजी सैनिकांच्या मुलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्रिय सैनिक बोर्डाच्या www.ksb.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई उपनगर जिल्हयातील सर्व माजी सैनिक/ विधवा यांना कळविण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये इयत्ता 12वी/पदवी/पदविका परिक्षांमध्ये किमान 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेले त्यांचे पाल्य ज्यांनी शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, दंत वैद्यकीय, पशुवैद्यकीय, बी.बी.ए., बी.टेक., बी.सी.ए., बी.एङ, औषध निर्माण शास्त्र, एम.बी.ए.,एम.सी.ए., आणि तत्सम व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवीच्या प्रथम वर्षासाठी शासन मान्यताप्राप्त महाविदयालयांत प्रवेश घेतला असेल अश्या पाल्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे.
नवी दिल्लीच्या केंद्रिय सैनिक बोर्डाकडून देशातून प्राप्त झालेल्या माजी सैनिक/विधवांचे पाल्य/ विधवा यांना त्यांना प्राप्त केलेल्या गुणांनुक्रमे/कॅटेगरी नुसार एकूण 5,500 पाल्यांना (मुले आणि मुली यांना प्रत्येकी समान 2,750 शिष्यवृत्तीचे वाटप) शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती अंतर्गत मुलांना 24,000 रुपये आणि मुलींना 27,000 रुपये प्रतिवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते.
सदर शिष्यवृत्तीसाठी अधिकृत अभ्यासक्रमाची यादी तसेच इतर अनुषंगिक बाबींची विस्तृत माहिती केंद्रीय सैनिक बोर्ड यांच्या वेबपोर्टलवर www.ksb.gov.in उपलब्ध आहे. पात्र असलेल्या माजी सैनिक/ विधवा पाल्य/विधवा यांना दिनांक 15 नोव्हेंबर 2016 रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत याबाबत ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन माजी लेफ्टनंट कमांडर मीनल मधु पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.