पाच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणी रद्द - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 September 2016

पाच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणी रद्द

मुंबई, दि. 23: वारंवार पत्राद्वारे विनंती करून आणि नोटीस बजावूनही वार्षिक विवरणपत्रे व लेखापरीक्षण लेख्याच्या प्रती सादर न केल्यामुळे पाच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांना आज येथे दिली.
सहारिया यांनी सांगितले की, जनता दल (सेक्युलर), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, राष्ट्रीय जनता दल, ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंट आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग या पाच इतर राज्यातील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्षांना 26 ऑगस्ट 2016 रोजी अंतिम नोटीस बजावण्यात आली होती. तत्पूर्वी अनेकदा त्यांना कागदपत्रे सादर करण्याबाबत लेखी विनंतीही करण्यात आली होती; परंतु त्यांनी संबंधित कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यांची राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणी आता रद्द करण्यात आली आहे.

Post Bottom Ad